SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘बिग बुल’ राकेश झुनझुनवाला यांचे निधन, मागे सोडली ‘इतकी’ संपत्ती..

शेअर मार्केटमधील बादशाह दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचे आजारपणामुळे निधन झालं. शेअर मार्केटमध्ये ‘बिग बुल’ (Big Bull) या नावाने ते प्रसिद्ध होते. वयाच्या 62व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. उपचार सुरु असतानाच, त्यांनी अखेरचा श्वास घेतला..

राकेश झुनझुनवाला यांना कीडनीचा आजार होता. मात्र, काही दिवसांपूर्वीच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र, आज सकाळी 6 वाजता पुन्हा त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना ‘ब्रिज कॅण्डी’ रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली…

Advertisement

गुंतवणुकदारांसाठी मार्गदर्शक

राकेश झुनझुनवाला यांना भारतीय शेअर बाजारातील (Share Market)  ‘वॉरेन बफे’ म्हटलं जातं असे. कारण, ज्या शेअरला ते हात लावतील, त्यात हमखास ‘प्रॉफिट’ मिळणार, असे समजले जात असे.. त्यामुळेच त्यांच्या पोर्टफोलिओवर नजर ठेवणाऱ्या किरकोळ गुंतवणूकदारांची संख्या मोठी आहे.

Advertisement

झुनझुनवाला यांचा स्ट्राँग पोर्टफोलियो व त्यांची शेअर बाजारातील कंपन्यांची समज व आकलन अगदी तंतोतंत होतं. फक्त 5000 रुपयांपासून त्यांनी सुरु केलेला प्रवास आज त्यांना हजारो कोटींच्या संपत्तीपर्यंत घेऊन आला होता. त्यामुळेच त्यांनी खरेदी केलेल्या शेअरमध्ये गुंतवणूक करणारे गुंतवणूदारांची संख्या मोठी होती.

राकेश झुनझुनवालांची संपत्ती जवळपास 33 हजार कोटींच्या जवळपास आहे. त्यांच्याकडे 31 मार्च 2021 रोजी संपलेल्या तिमाहीत 37 शेअर्समध्ये सार्वजनिक होल्डिंग आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी ‘अकासा’ नावाने स्वत:ची विमान कंपनी सुरू केली होती. ‘अकासा एअरलाईन’चं पहिल्या विमानाने मुंबई-अहमदाबाद असं उड्डाण भरलं होतं..

Advertisement

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement