SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘राजस्थान राॅयल्स’च्या मालकाने कानाखाली मारल्या, ‘या’ खेळाडूचा धक्कादायक आरोप..!!

जगभरातील क्रिकेट चाहत्यांसाठी एक खळबळजनक बातमी समोर येत आहे.. न्युझीलंड क्रिकेट संघाचा माजी कॅप्टन रॉस टेलर याने नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.. त्यानंतर त्याचे ‘राॅस टेलर ब्लॅक अॅण्ड व्हाईट’ (Ross Taylor : Black & White) हे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले आहे.. त्यात त्याने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.

न्यूझीलंड क्रिकेट संघात आपल्याला मोठ्या प्रमाणात वर्णद्वेषाचा सामना करावा लागल्याचा आरोप टेलरने आपल्या आत्मचरित्रात केला हाेता.. त्यानंतर आता आणखी एक खळबळजनक खुलासा त्याने केला आहे.. ‘आयपीएल’मधील (IPL) ‘राजस्थान रॉयल्स’च्या (Rajasthan Royals) संघ मालकाने माझ्या कानशिलात लगावल्याचा आरोप त्याने केलाय.

Advertisement

नेमकं प्रकरण काय..?

राॅस टेलर ‘आयपीएल’मध्ये रॉयल चॅलेंजर बेंगलोरकडून 2008 ते 2010 पर्यंत खेळला.. नंतर तो 2011 मध्ये ‘राजस्थान रॉयल्स’ संघात गेला. नंतर त्याने दिल्ली कॅपिटल्स व पुणे वॉरियर्स संघाचेही प्रतिनिधित्व केलंय. राजस्थान संघाकडून खेळताना पंजाब संघाविरुद्ध धावांचा पाठलाग करताना तो शून्यावरच बाद झाला होता..

Advertisement

“पंजाब किंग्जविरूद्ध मोहालीत राजस्थान रॉयल्सचा संघ खेळत होता. राजस्थानसमोर पंजाबने 195 धावांचे तगडे आव्हान दिलं होतं… मात्र, धावांचा पाठलाग करताना, मी शुन्यावर पायचीत बाद झालो. आम्हाला या धावसंख्येच्या जवळपासही जाता आले नाही. सामना झाल्यानंतर संघ, सपोर्ट स्टाफ व व्यवस्थापन सदस्य हॉटेलच्या बारमध्ये गेलो होते..”

“लिझ हर्ले, शेन वॉर्न हेदेखील तेथे उपस्थित होते. ‘राजस्थान रॉयल्स’चा एक संघमालक मला म्हणाला, की रॉस आम्ही तुला शुन्यावर बाद होण्यासाठी लाखो डॉलर्स देत नाही. त्यानंतर त्याने मला तीन-चार वेळा कानशिलात लगावली. त्यावेळी तो हसत होता नि त्याने हळुवारपणे कानशिलात मारल्या होत्या. त्यामुळे खेळकर वृत्तीने त्याने मारले होते की नाही, याबाबत मी साशंक आहे. मात्र, माझ्या क्रिकेट कारकिर्दित असा प्रसंग घडेल, याचा मी कधी विचारही केला नव्हता..” असं टेलरनं म्हटलं आहे.

Advertisement

दरम्यान, राॅस टेलरच्या या आरोपामुळे क्रिकेट जगतात खळबळ उडाली आहे.. याबाबत ‘राजस्थान राॅयल्स’ संघाकडून कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही..

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement