SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर, कोणत्या मंत्र्याकडे कोणतं खातं…?

राज्याच्या राजकारणातून एक महत्वाची बातमी समोर येत आहे.. शिंदे सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार 40 दिवसांनंतर झाला.. 8 ऑगस्टला 18 मंत्र्यांना शपथ दिली खरी, मात्र त्यानंतर खातेवाटपाचा निर्णय होत नव्हता.. त्यावरुन विरोधकांकडून शिंदे सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका होत होती. अखेर आज हा तिढा सुटला..

राज्यातील मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर झालं आहे.. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले. त्यानुसार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, तसेच अर्थ मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. ‘राष्ट्रवादी’कडील सर्व महत्त्वाची खाती फडणवीसांकडे आल्याचं दिसतंय.

Advertisement

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, तसेच नगरविकास खात्याची जबाबदार असेल. कोणत्या मंत्र्यांकडे कोणत्या खाते देण्यात आले आहे, याबाबत जाणून घेऊ या..

मंत्र्यांचे खातेवाटप असे

Advertisement

राधाकृष्ण विखे-पाटील – महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास
सुधीर मुनगंटीवार– वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय
चंद्रकांत पाटील- उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य

डॉ. विजयकुमार गावित- आदिवासी विकास
गिरीष महाजन- ग्रामविकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण
गुलाबराव पाटील- पाणीपुरवठा व स्वच्छता

Advertisement

दादा भुसे- बंदरे व खनिकर्म
संजय राठोड– अन्न व औषध प्रशासन
सुरेश खाडे– कामगार

संदीपान भुमरे- रोजगार हमी योजना व फलोत्पादन
उदय सामंत– उद्योग
प्रा.तानाजी सावंत- सार्वजनिक आरोग्य व  कुटुंब कल्याण

Advertisement

रवींद्र  चव्हाण – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व  नागरी पुरवठा व  ग्राहक संरक्षण
अब्दुल सत्तार– कृषी
दीपक केसरकर– शालेय शिक्षण व  मराठी भाषा

अतुल सावे- सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण
शंभूराज देसाई- राज्य उत्पादन शुल्क
मंगलप्रभात लोढा- पर्यटन, कौशल्य विकास व  उद्योजकता, महिला व बालविकास

Advertisement

दरम्यान, भाजपकडून मंत्रीमंडळाच्या खातेवाटपातही अनेकांना धक्का दिला आहे.. युती सरकारच्या काळात चंद्रकांत पाटील यांच्याकडे महसूल खातं होतं. यावेळीही त्यांना हाच विभाग हवा होता. त्यासाठी ते आग्रही होते. पण, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी महसूल विभागाची जबाबदारी राधाकृष्ण विखे पाटलांवर दिली आहे..

मंत्रिमंडळ विस्तारात ‘गुजरात पॅटर्न’ राबवला जाणार असल्याची चर्चा होती. त्यानुसार, नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याचे बोलले जात होते.. मात्र, भाजपने आपल्या ज्येष्ठ मंत्र्यांनाच पुन्हा एकदा संधी दिली आहे.. मात्र, त्यावरुन भाजपसह शिंदे गटातही मोठ्या प्रमाणात नाराजी असल्याचं बोललं जात आहे..

Advertisement

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा  👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement