SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आता लग्नावरही ‘जीएसटी’..!! प्रत्येक गोष्टींसाठी मोजावे लागणार जादा पैसे…

देशात जवळपास प्रत्येक जीवनावश्यक वस्तूंवर ‘जीएसटी’ (वस्तू व सेवा कर) लागू करण्यात आला आहे. आधीच महागाईने त्रस्त झालेले नागरिकांवर ‘जीएसटी’चा बोजा पडला आहे.. त्यामुळे सर्वसामान्यांचा खिसा खाली होत आहे. ‘जीएसटी’च्या कचाट्यातून लग्न सोहळाही सुटलेला नाही.. त्यावरही ‘जीएसटी’ भरावा लागणार असल्याने, आता लग्नाचा खर्चही वाढणार आहे..

सध्या सणासुदीचे दिवस आहेत. दिवाळीनंतर लग्न सोहळ्याला सुरुवात होईल.. मात्र, नवरात्र उत्सवानंतरच लोकांना मॅरेज हॉल, तंबू, केटरर्स आदींचे बुकिंग सुरू करावे लागेल.. त्यासाठी आगाऊ रक्कम भरावी लागेल.. उरलेली रक्कम लग्न जवळ आल्यावर किंवा झाल्यानंतर द्यावी लागते… मात्र, या साऱ्या खर्चात आता ‘जीएसटी’चा (GST) वेगळाच भार पडणार आहे..

Advertisement

कशावर किती ‘जीएसटी’..?

  • सर्वाधिक 18 टक्के ‘जीएसटी’ लग्नाच्या गार्डनवर आकारला जाणार आहे.. म्हणजे, 2 लाखांच्या लग्नाच्या गार्डनसाठी 36 हजार रुपये ‘जीएसटी’चेच होतील..
  • एक लाखाचा तंबू उभारल्यास, त्यावर 18 हजारांचा ‘जीएसटी’ भरावा लागेल.
  • दीड लाखांच्या केटरिंगवर 27 हजारांचा कर होईल.
  • डेकोरेशन, बँड बाजा, फोटो-व्हिडिओ, लग्नपत्रिका, घोडा, ब्युटी पार्लर व लाइटिंगवरही 18 टक्के ‘जीएसटी’ आहे.
  • नवीन कपडे, पादत्राणांवर 5 ते 12 टक्के कर असेल..
  • सोन्याच्या दागिन्यांवर 3 टक्के ‘जीएसटी’ आहे. 3 लाखांचे दागिने खरेदी केल्यास 6 हजार रुपये कर भरावा लागेल.
  • बस-टॅक्सी सेवेवरही 5 टक्के ‘जीएसटी’ असेल.

‘जीएसटी’चेच ‘सनई-चौघडे’

Advertisement

लग्नावर 5 लाखांचा खर्च झाल्यास, वर 75 हजार रुपये फक्त ‘जीएसटी’चे भरावे लागतील. तोच खर्च 10 लाखांवर गेल्यास, वेगवेगळ्या सेवांसाठी दीड लाखांहून अधिक ‘जीएसटी’ भरावा लागणार आहे. त्यामुळे वधू पित्याची चिंता वाढली आहे.. लग्नासाठी लागणाऱ्या प्रत्येक वस्तूवर करआकारणी होणार असल्याने, लग्नात ‘जीएसटी’चेच ‘सनई-चौघडे’ वाजणार असल्याचे दिसते..

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement