SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य: तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या..

मेष (Aries): प्रत्येक पाऊल घाईने टाकून चालणार नाही. मनातील इच्छेसाठी आग्रही राहाल. वरिष्ठांच्या रोषाला बळी पडू नका. थोडीफार कसरत करावी लागू शकते. घरात नातेवाईकांची ऊठबस राहील. भावनेच्या प्रवाहात वाहत जाऊन कुठलाही निर्णय घेऊ नका. वाद-विवाद टाळा. कुटुंबियांसोबत वाद होण्याची शक्यता आहे. तुमचे मामा किंवा आजोबा तुमची आर्थिक मदत करण्याची शक्यता आहे. मित्रपरिवार आणि कुटुंबियांबरोबर एखादा कार्यक्रम आयोजित करा.

वृषभ (Taurus): तुमची कार्यप्रवीणता वाढेल. जोमाने नवीन काम हातात घ्याल. परोपकाराची भावना जागृत ठेवाल. रागावर नियंत्रण ठेवा. श्रम व दगदग वाढेल. भाऊ तसेच इतर नातेवाईकांसोबत सुरू असलेल्या व्यवहारात चांगला लाभ होईल. कामाच्या व्यापामुळे ताण जाणवण्याची शक्यता आहे. तुमच्याकडे नवीन गोष्टी असतील ज्यामुळे तुमची सामाजिक स्थिती सुधारेल आणि तुमचे समाधान होईल.

मिथुन (Gemini) : तुमच्या बोलण्याने लोक प्रभावित होतील. व्यावसायिक अडचण दूर होईल. भागिदारीतून चांगला लाभ होईल. जोडीदाराशी जवळीक वाढेल. संपर्कातून आठवणींना उजाळा द्याल. सरकारी कार्यालयात काम करणाऱ्यांसाठी दिवस चांगला असेल. प्रलंबित कामे पूर्ण होतील. धनलाभ होण्याची चिन्हं आहेत. व्यापाऱ्यात लाभ होईल. चांगला व्यावसायिक लाभ मिळेल. अचानक धनलाभाचे योग आहेत.

कर्क (Cancer) : जोडीदाराची प्राप्ती वाढेल. मानसिक संतुलन ठेवावे लागेल. कौटुंबिक गोष्टी येणार्‍या वेळेवर सोडाव्या. संपर्कातील लोक भेटतील. मनाची द्विधावस्था दूर ठेवा. तुमच्या स्वभावात क्रोध, राग दिसून येईल. आरोग्याची काळजी घ्या. कार्यालयात वातावरण चांगले असेल. अधिकारी वर्गाच्या हातात अडकलेले कामे पूर्ण होतील. मित्रांचा सहयोग मिळेल. प्रवासाचे योग संभवतात. स्वत:ला आवडत्या कामात गुंतवून घ्यावे.

सिंह (Leo) : मनोबल वाढवावे लागेल. व्यवसायातून चांगला लाभ संभवतो. आर्थिक जबाबदारी उत्तमरीत्या पेलाल. घरगुती प्रश्न मार्गी लावाल. क्षुल्लक गोष्टींकडे दुर्लक्ष करावे. शारीरिक स्वास्थ्य चांगले राहील. मन प्रसन्न असेल. विद्यार्थी अभ्यासात चांगली प्रगती करतील. साहित्य, कला क्षेत्रातील व्यक्तींसाठी दिवस चांगला असेल. मनातील चुकीचे विचार काढून टाका. कामाचा ताण वाढला तरी फायद्यात राहाल.

कन्या (Virgo) : बौद्धिक क्षमतेचा कस लागू शकतो. मुलांचे वागणे विरोधी वाटू शकते. हेकटपणे वागून चालणार नाही. जोडीदाराचा लाडिक हट्ट पुरवाल. आर्थिक व्यवहारात सजगता दाखवावी. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आजारपणामुळे पैसे अधिक खर्च होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला असेल. कौटुंबिक जबाबदारी अंगावर पडेल. प्रिय व्यक्तीची आवड पूर्ण करावी लागेल. सर्वांना प्रेमाने आपलेसे कराल.

तुळ (Libra) : सरळमार्गी जमेल तेवढे करावे. मनातील इच्छेला प्राधान्य द्या. हातातील कामात यश येईल. नव्या उर्जेने कामे कराल. प्रेमप्रकरणाला उभारी मिळेल. वैवाहिक आयुष्यात जोडीदाराची चांगली साथ मिळेल. कामात चांगले यश प्राप्त होईल. वायफळ खर्च टाळा. प्रवासाचा योग लवकरच निर्माण होईल. कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवावा. तुम्ही मादक गोष्टींवर खर्च न करण्याचा तुम्हाला सल्ला दिला जातो.

वृश्‍चिक (Scorpio) : भावनिक गोंधळ वाढवू नका. अचानक धनलाभाची शक्यता. कौटुंबिक सौख्यात वाढ होईल. आज कामात फार मोठे बादल करू नका. उद्दीष्ट ठरवून ठेवा. बाहेरील खाद्य-पदार्थ खाणं टाळा. मित्रांसोबत वेळ घालवण्याची संधी चालून येईल. व्यापाऱ्यांना मोठा लाभ होण्याची शक्यता आहे. नसत्या शंका मनात आणू नका. व्यावसायिक कामात स्पष्टता ठेवावी. वैचारिक गोंधळ घालू नका. महत्वपूर्ण प्रश्नांचे निराकरण होईल.

धनु (Sagittarius) : कामात चातुर्य दाखवावे लागेल. खर्चाचा ताळमेळ घालावा लागेल. छानछोकीवर खर्च करावा लागेल. दिवस भटकंतीत घालवाल. जोडीदाराच्या आग्रहाला बळी पडाल. व्यावसायिक क्षेत्रात तुमच्या कार्याचं खूपच कौतुक होईल. कामात चांगले यश प्राप्त होईल. स्थावर संपत्ती वाढण्याचा योग निर्माण होईल. आज दिवस खूप चांगला आहे. चर्चेला अधिक वाव द्यावा. तरुण मित्रांच्यात वावराल. नवीन ओळखी होतील. अनुभवी लोकांचा सल्ला विचारात घ्यावा.

मकर (Capricorn) : संमिश्रतेचा ताण कमी होईल. मत्सराला बळी पडू नका. आर्थिक व्यवहारात सावध रहा. उत्तम वाहन सौख्य मिळेल. ऐषारामाच्या वस्तु खरेदी कराल. कार्यालयातून दिलेलं काम पूर्ण कराल. प्रवासाचा किंवा पर्यटनाचा योग महिन्याभरात निर्माण होईल. काही रखडलेले प्रकल्प आता मार्गी लागतील. पगारदार लोकांना प्रमोशन मिळू शकते आणि इच्छित ठिकाणी बदली देखील शक्य आहे. आपले विचार उत्तमरीत्या मांडाल.

कुंभ (Aquarious) : कामातील दिरंगाई टाळावी. काही कामे चातुर्याने करावी लागतील. अतितत्परता दाखवू नका. वाढत्या व्यापामुळे थकवा जाणवेल. हटवादीपणा करून चालणार नाही. बँकिंग क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना दिवस चांगला असेल. दिलेली जबाबदारी वेळेपूर्वी पूर्ण करतील आणि वरिष्ठांची मनं जिंकतील. चोरांपासून सावध राहावे. मित्रांशी पैज लावाल. आपला संयम ढळू देऊ नका. बचत करण्यावर अधिक भर द्यावा. कौटुंबिक गरजा ध्यानात घ्या.

मीन (Pisces) : स्वत:साठी थोडा वेळ काढावा. व्यावसायिक वाढीसाठी नवीन धोरण आखाल. जवळच्या लोकांच्या भेटीने खुश व्हाल. तुमचा सामाजिक दर्जा सुधारेल. कामाव्यतिरिक्त इतर व्यापात गुंतून पडाल. वाद-विवाद होऊ शकतो. जीभेवर ताबा ठेवा आणि वाद टाळण्याचा प्रयत्न करा. नव्या कामाची सुरूवात करण्यास दिवस चांगला आहे. हसत-हसत आपले मत मांडावे. चैतन्याने सळसळता असा आणखी एक दिवस, अनपेक्षित लाभ दृष्टीपथात असतील.

Advertisement