SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

रेल्वे कुठपर्यंत पोहोचली क्षणात समजणार, पेटीएम देणार भन्नाट सुविधा..

देशातील प्रसिद्ध कंपन्यांपैकी एक असलेल्या पेटीएमने (Paytm) आपल्या ॲपमध्ये महत्वाचे बदल केले आहेत. कारण आता रेल्वेने (Train) प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी पेटीएम ट्रेन तिकीट बुक करण्यासाठी नवे फिचर सुरू केले आहे. आता या नवीन सुविधेमुळे रेल्वेसंबंधी माहीती मिळण्यास अधिक सुलभता येणार असल्याच कंपनीने म्हटलं आहे.

जर तुम्हाला ट्रेन ने प्रवास करायचा असेल तर तुम्हाला सर्वात आधी पेटीएम (Paytm) वापरकर्त्यांना अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही प्लॅटफॉर्मवर पेटीएम ॲप अपडेट करावे लागणार आहे. पेटीएम ॲपद्वारे, वापरकर्ते रेल्वेचे तिकीट बुक करू शकतात. महत्वाचं म्हणजे पीएनआर (PNR) आणि ट्रेनची सध्याची स्थिती तपासू शकतात. म्हणजेच पेटीएम सध्या ट्रेन सध्या कुठं आहे, वेळेविषयी (Paytm Live Train Status) माहीती देणार आहे. म्हणून तुम्हाला आता पेटीएम ॲपचा वापर करुन ट्रेन कुठेपर्यंत पोहचली आहे, हे कळू शकणार आहे.

Advertisement

पेटीएम ॲपवर Live Train Status कसं बघायचं..?

▪️ पेटीएम ॲप ओपन केल्यावर ट्रेनचे स्टेटस शोधा.

Advertisement

▪️ पेटीएम ट्रॅव्हल सेक्शन ओपन होईल, त्याद्वारे तुम्ही ट्रेन, बस, फ्लाइट इत्यादी ट्रॅक करू शकता.

▪️ तुम्हाला ‘ट्रेन’ ऑप्शन निवडा. आता येथे तुम्हाला PNR स्टेटस, लाइव्ह ट्रेन स्टेटस, ट्रेन कॅलेंडर आणि ऑनलाईन जेवण ऑर्डर करण्याचा ऑप्शन मिळेल.

Advertisement

▪️ आता तुम्ही ट्रेन नंबर इनपुट करू शकता आणि सर्च फंक्शनवर टॅप करू शकता.

▪️ एकदा तुम्ही माहिती प्रविष्ट केल्यानंतर, पेटीएम ॲप येणारे स्टेशन, शेवटचे स्टेशन, जवळचे स्टेशन, प्रवासासाठी शिल्लक वेळ, प्लॅटफॉर्म डिटेल्स, आगमन आणि प्रस्थान वेळ आणि अपेक्षित आगमन वेळ यासह सर्व प्रवासाची माहिती दाखवेल.

Advertisement

▪️ त्याचप्रमाणे, तुम्ही तुमच्या तिकीट बुकिंगची स्थिती तपासण्यासाठी तुमचा पीएनआर नंबर इनपुट करू शकता.

▪️ तुम्ही ट्रेन कॅलेंडर देखील पाहू शकता, ज्यामध्ये तुम्ही एका आठवड्यात धावणाऱ्या रेल्वेचे दिवस आणि सर्व वर्गातील जागांची उपलब्धता पाहू शकणार आहात.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 http://play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement