SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

तिरंगा गाडीवर लावता येतो का..? कोणाला लावता येतो, याबाबतचे नियम काय..?

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशभर मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यानिमित्त ‘हर घर तिरंगा’ अभियानाची घोषणा केली असून, 13 ते 15 ऑगस्टदरम्यान प्रत्येक घरावर तिरंगा फडकावण्याचे आवाहन केले आहे.. तसेच, प्रत्येकाने सोशल मीडियावरील ‘डीपी’वर तिरंगा ठेवण्यास सांगितले जात आहे..

पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनानुसार, अनेकांनी आजपासून घरांवर तिरंगा फडकावला आहे.. तसेच, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर भारतीय राष्ट्रध्वज ठेवला जात आहे.. स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन जवळ आल्यानंतर अनेक जण गाड्यांवर तिरंगा लावून फिरत असतात.. मात्र, असं करता येतं का, याबाबत ध्वजसंहिता काय सांगते, हे सविस्तर जाणून घेऊ या..

Advertisement

नियम काय सांगतो..?

सध्या अनेकांनी कार, बाईक किंवा अन्य वाहनांवर भारतीय ध्वज लावला आहे. वाहनांवर तिरंगा लावण्याचा त्यांचा हेतू चुकीचा असू शकत नाही, मात्र असं केल्यास या लोकांवर कारवाई केली जाऊ शकते.. कारण, भारतीय राष्ट्रध्वज गाडीच्या बोनेटवर किंवा हुडवर, टॉप आणि साइड आणि पाठीमागे लावता येत नाही.. तसे केल्यास ते राष्ट्रध्वजाच्या नियमांचे उल्लंघन मानले जाते.

Advertisement

भारतीय ध्वजसंहितेनुसार, ट्रेन, बोट, विमान किंवा इतर कोणत्याही तत्सम वस्तूच्या हुडवर, वरच्या बाजूला किंवा मागील बाजूस तिरंगा लावता येत नाही.. भारतीय राष्ट्रध्वजाचा तो अनादर, अपमान मानला जातो. तसे करणाऱ्यास भारतीय ध्वज कायदा आणि नियमानुसार 3 वर्षांपर्यंत कारावास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

गाडीवर कोणाला तिरंगा लावता येतो..?

Advertisement

भारतात ठराविक लोकांनाच गाडीवर राष्ट्रध्वज लावण्याचा अधिकार आहे.. तसेच, वाहनावर तो कुठेही लावता येत नाही.. त्यासाठी काही विशिष्ट नियम आहेत. देशाचा राष्ट्रध्वज लावण्याचा अधिकार नक्की कोणाला आहे, हे जाणून घेऊ या..

 • राष्ट्रपती
 • उपराष्ट्रपती
 • राज्यपाल
 • नायब राज्यपाल
 • परराष्ट्रातील भारतीय वकिलातीचे मुख्यालय (त्या देशात)
 • पंतप्रधान व इतर कॅबिनेट मंत्री
 • केंद्रातील राज्यमंत्री व उपमंत्री
 • लोकसभेचे सभापती
 • राज्यसभेचे उपसभापती
 • लोकसभेचे उपसभापती
 • मुख्यमंत्री व इतर कॅबिनेट मंत्री
 • राज्याचे किंवा संघराज्य प्रदेशातील राज्यमंत्री व उपमंत्री
 • राज्यांच्या विधानपरिषदांचे अध्यक्ष
 • राज्य व संघराज्य प्रदेशांच्या विधानसभांचे सभापती
 • विधान परिषदांचे उपाध्यक्ष
 • राज्य व संघराज्य प्रदेशांच्या विधानसभांचे उपसभापती
 • भारताचे सरन्यायधीश
 • सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश
 • उच्च न्यायालयांचे मुख्य न्यायाधीश
 • उच्च न्यायालयांचे न्यायाधीश

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement