SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

नोकरदारांसाठी आनंदाची बातमी, पेन्शनबाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय..!!

खासगी कंपन्यांमधील कर्मचारी, तसेच असंघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.. मोदी सरकारने ‘एनपीएस’,(नॅशनल पेन्शन सिस्टम), तसेच ‘एपीवाय’ (अटल पेन्शन योजना)बाबत मोठा निर्णय घेतला आहे.. त्यानुसार, नागरिकांना आता आपल्या पेन्शन खात्यात ‘युपीआय'(UPI)द्वारे थेट पैसे जमा करता येणार आहेत.

पेन्शन खात्यांचे नियमन करणाऱ्या ‘पेन्शन निधी नियामक आणि विकास प्राधिकरणा’ने (पीएफआरडीए) नुकतीच याबाबतची घोषणा केली. आतापर्यंत या दोन्ही योजनांच्या खातेदारांना ‘एनईएफटी’, ‘आरटीजीएस’, ‘आयएमपीएस’द्वारे नेटबँकिंग खात्याद्वारे पैसे भरता येत होते.. आता त्याची व्याप्ती वाढवल्याने ही प्रक्रिया अधिक सोपी व जलद होणार आहे..

Advertisement

तसेच, आता सकाळी साडेनऊ वाजण्याच्या आधी खात्यावर पैसे जमा केल्यास, हे योगदान त्याच दिवशी केलेली गुंतवणूक समजली जाणार आहे.. मात्र, त्यानंतर पैसे जमा केल्यास, ही रक्कम दुसऱ्या दिवशीपासून गुंतवणुकीसाठी मोजली जाणार आहे.. ‘पेन्शन फंड रेग्युलेटर’तर्फे ही माहिती देण्यात आली..

स्वतंत्र्य हॅण्डल तयार..
‘एनपीएस’ (NPS) व ‘एपीवाय’ (APY) योजनांमध्ये ‘यूपीआय’द्वारे पैसे भरताना, ते ‘डायरेक्ट रेमिट’ (डी-रेमिट) अंतर्गत भरता येतील. ही सुविधा ‘टियर-1’ आणि ‘टियर-2’ खात्यांसाठी असेल. ‘डी-रेमिट’ करण्यासाठी ‘पेन्शन फंड रेग्युलेटर’तर्फे स्वतंत्र हॅण्डल तयार केलं आहे. ‘यूपीआय’द्वारे पैसे भरण्यासाठी [email protected] हे हॅण्डल वापरावं लागणार आहे.

Advertisement

ऑटो डेबिट सेट करण्याची मुभा ‘डी-रेमिट’ देते. हा कालावधी मासिक, त्रैमासिक, सहामाही असा सेट करता येईल. ‘एनपीएस’ ही पेन्शन योजना संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी, तर ‘एपीवाय’ ही पेन्शन योजना मुख्यतः असंघटित क्षेत्रांतील कर्मचाऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून तयार करण्यात आली आहे..

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement