SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘या’ कंपनीकडून सर्वात स्वस्त प्लॅन सादर, एक वर्षासाठी डेटा, काॅलिंग नि बरंच काही…

गेल्या काही दिवसांत टेलिकाॅम क्षेत्रातील कंपन्यांमध्ये कमालीची स्पर्धा वाढलीय.. जास्तीत जास्त ग्राहक खेचण्यासाठी या कंपन्यांकडून सवलतींचा भडीमार केला जात आहे.. टेलिकॉम कंपन्यांच्या पोर्टफोलियोमध्ये अनेक आकर्षक ऑफर्स असल्या, तरी कधी कधी ग्राहकांना योग्य प्लॅन निवडताना अडचण होते..

खरं तर रिचार्ज प्लॅन निवडताना सर्वप्रथम तुमची गरज काय, हे ओळखणं महत्वाचं आहे.. तुम्ही ‘व्हॅल्यू फॉर मनी’ प्लॅनच्या शोधात असाल, तुम्हाला दीर्घकालीन ‘व्हॅलिडिटी’ हवी असेल, तर ‘एअरटेल’ने तुमच्यासाठी खास प्लॅन आणला आहे.. या प्लॅनमध्ये ग्राहकांना नेमक्या काय सेवा मिळतील, याबाबत सविस्तर जाणून घेऊ या..

Advertisement

‘एअरटेल’चे वार्षिक प्लॅन्स…

‘एअरटेल’च्या पोर्टफोलियोमध्ये (Airtel recharge plans) सध्या 3 वार्षिक प्लॅन्स आहेत. तुम्हाला जास्त प्रमाणात नेट डेटाची गरज नसेल, तर ‘एअरटेल’कडून अगदी स्वस्तात प्लॅन आणले आहेत..

Advertisement

1799 रुपयांचा प्लॅन

 • ‘एअरटेल’च्या ग्राहकांना या प्लॅनमध्ये वर्षभराची (365 दिवस) ‘व्हॅलिडीटी’ मिळते.
 • वर्षभरासाठी या प्लॅनमध्ये एकूण 24 जीबी डेटा मिळतो. हा प्लॅन संपूर्ण व्हॅलेटिडीसह उपलब्ध आहे.
 • प्लॅनमध्ये अनलिमिटेड लोकल व एसटीडी कॉल्स, रोमिंग कॉल्ससह एकूण 3600 ‘एसएमएस’चा फायदा मिळतो.
 • प्लॅनसोबत Apollo 24/7 Circle चं तीन महिन्यांचं फ्री सब्सक्रिप्शन मिळेल.
 • शिवाय फास्टॅगवर 100 रुपयांचे ‘कॅशबॅक’ मिळवता येईल. युझर्स फ्री हॅलो ट्यून व विंक म्युझिकचा लाभ घेऊ शकतात.

2999 रुपयांचा प्लॅन

Advertisement
 • ‘एअरटेल’च्या या वार्षिक प्लॅनमध्ये (365 दिवस) अनलिमिटेड कॉलिंग मिळते.
 • रोजचा 2 जीबी डेटा मिळतो.
 • रिचार्जमध्ये रोज 100 ‘एसएमएस’ फ्री आहेत.

3359 रुपयांचा प्लॅन

 • एअरटेलच्या या वार्षिक प्लॅनमध्ये युजर्सना रोज 2.5 जीबी इंटनेट डेटा मिळतो.
 • तसेच अनलिमिटेड कॉलिंगसह ‘एसएमएस’ सुविधा मिळते.
 • डिस्ने + हाॅटस्टारचे (Disney + Hotstar) एका वर्षाचं सब्सक्रिप्शन मिळतं.

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement