SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

रिषभ पंत व अभिनेत्रीमध्ये रंगलाय जोरदार वाद, नेमक प्रकरण काय, जाणून घ्या..!!

बाॅलिवूड नि क्रिकेटचं नातं तसं जूनचं.. त्यामुळेच भारतीय क्रिकेटपटू नि बाॅलिवूड अभिनेत्रींमधील अफेयरची चर्चा नेहमीच सुरु असते.. त्यातून कधी कधी वादही रंगतात.. असाच एक वाद नुकताच समोर आलाय.. त्यामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांचं चांगलंच मनोरंजन होताना दिसत आहे..

भारतीय क्रिकेट संघाचा विकेट किपर रिषभ पंत व अभिनेत्री उर्वशी रौतेला यांच्यात सध्या ‘तू तू.. मै मै’ सुरु आहे.. काही दिवसांपूर्वी या दोघांच्या अफेअरचीही चर्चा होती. मात्र, आता त्यांच्यात जोरदार शाब्दिक ‘वॉर’ सुरु आहे.. नेमकं हे प्रकरण काय आहे, याबाबत सविस्तर जाणून घेऊ या..

Advertisement

नेमकं प्रकरण काय..?

उर्वशीने नुकतीच एक मुलाखत दिली.. त्यात तिने दिल्लीतील शूटिंग दरम्यानचा एक किस्सा सांगितला. या मुलाखतीत बोलताना तिनं असा दावा केला, की कोणीतरी तिला भेटण्यासाठी रात्रभर तिची वाट पाहत होता. ती म्हणाली, की ‘हॉटेलच्या लॉबीमध्ये ‘आरपी’ (RP) आला होता नि त्याला मला भेटायचं होतं. 10 तास शुटिंग झाल्याने मी झोपले होते..”

Advertisement

“मी त्याचा एकही कॉल घेऊ शकले नाही.. मला जाग आली, तेव्हा 16-17 मिस्ड कॉल दिसले.. मला खूप वाईट वाटलं. कोणीतरी माझी वाट पाहतंय नि मी त्यास भेटू शकले नाही. मी त्याला म्हणाले, की मुंबईला गेल्यावर भेटू. त्यानंतर आम्ही मुंबईत भेटलो, पण ‘पापाराझीं’मुळे खूप मोठा ड्रामा झाला…” उर्वशीने या मुलाखतीत थेट रिषभचे नाव घेतलं नव्हतं..

दरम्यान, यानंतर रिषभने ‘इन्स्टाग्राम’वर एक ‘पोस्ट’ केली.. त्यात त्यानं असं म्हटलं होतं, की “लोकप्रियतेसाठी, हेडलाईन्समध्ये झळकण्यासाठी काही लोक मुलाखतींमध्ये खोटं बोलतात.. हे मजेशीर आहे. काही लोक प्रसिद्धीसाठी व नावासाठी किती भुकलेले आहेत, याचं वाईट वाटतं. देव त्यांना आशीर्वाद देवो..” सोबत त्याने ‘मेरा पिछा छोडो बहन..’, ‘झूठ की भी सीमा होती है..’ असे ‘हॅशटॅग’ वापरले होते.

Advertisement

 

View this post on Instagram

 

Advertisement

A post shared by Urvashi Rautela (@urvashirautela)

Advertisement

‘छोटू भैय्या, बॅट-बॉलच खेळ..

हा ड्रामा येथेच संपला नाही.. रिषभच्या या उत्तरावर उर्वशीने पुन्हा एकदा निशाणा साधला.. ‘छोटू भैय्या, बॅट-बॉलच खेळ… मी काही मुन्नी नाही जी बदनाम होईल, तीसुद्धा तुझ्यासाठी.. रक्षाबंधनाच्या शुभेच्छा. आरपी छोटू भैया.. शांत मुलीचा गैरफायदा घेऊ नकाे..” असं म्हणतानाच, उर्वशीने स्वतःला ‘कूगर हंटर’ असा हॅशटॅग वापरलाय.. त्यावर आता रिषभ काय उत्तर देतोय, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे..

Advertisement

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement