SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

ब्रेकींग: भाडेकरूंसाठी मोठी बातमी, आता तुम्हालाही जीएसटी भरावा लागणार..?

जीएसटीच्या नवीन नियमांतर्गत भाड्याच्या घरात राहणाऱ्या लोकांसाठी एक महत्त्वाचा नियम लागू झाला आहे. जीएसटी कौन्सिलच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत जीएसटीशी संबंधित अनेक नियमांमध्ये बदल करण्यात आले. ज्यामध्ये घरभाड्याशी संबंधित नियम समाविष्ट आहेत. जीएसटी कौन्सिलच्या 47 व्या बैठकीनंतर लागू करण्यात आलेल्या या नवीन बदलाचा परिणाम कंपन्या किंवा व्यावसायिकांवर होणार आहे.

18 जुलैपासून लागू झालेल्या जीएसटी नियमांनुसार, भाडेकरूंना भाड्यासह 18 टक्के जीएसटी भरावा लागेल.
GST च्या नियमांनुसार काही विशिष्ट परिस्थितीत घराच्या भाड्यावर जीएसटी भरावा लागेल. म्हणजेच हा नियम केवळ त्या भाडेकरूंना लागू होईल ज्यांनी व्यवसायासाठी जीएसटी अंतर्गत नोंदणी केली आहे.

Advertisement

पूर्वीच्या नियमांनुसार, जेव्हा कोणी निवासी मालमत्ता घेऊन त्याचा वापर व्यावसायिक मालमत्ता म्हणून जसे की कार्यालये किंवा किरकोळ जागा भाड्याने घेऊन वापर करत असेल तर जीएसटी आकारला जात नसे. मात्र जेव्हा व्यावसायिक मालमत्ता जसे कार्यालये किंवा किरकोळ जागा भाड्याने घेतली की जीएसटी आकारला जातो.

आता निवासी मालमत्ता भाड्याने घेऊन व्यवसाय करणाऱ्या भाडेकरूला 18 टक्के कर भरावा लागणार, अशी केंद्र सरकारने माहीती दिली आहे. हा 18 टक्के जीएसटी फक्त तेव्हाच लागू होईल जेव्हा भाडेकरू जीएसटी अंतर्गत नोंदणीकृत असेल आणि तो जीएसटी रिटर्न भरण्याच्या श्रेणीत येत असेल. तसेच भाडेकरू इनपुट टॅक्स क्रेडिट अंतर्गत वजावट म्हणून भरलेल्या जीएसटीचा दावा करू शकतो. रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम अंतर्गत भाडेकरूला तो देत असलेल्या भाड्याच्या रकमेवर 18% GST द्यावा लागेल.

Advertisement

कोणावर होईल परिणाम?

जर एखादी कंपनी किंवा व्यक्ती आपली निवासी मालमत्ता कर्मचार्‍यांचे निवासस्थान, गेस्ट हाऊस किंवा कार्यालयाच्या वापरासाठी देत ​​असेल, तर ती निवासी मालमत्ता भाड्याने घेणार्‍या किंवा लीजवर घेणाऱ्या कर्मचारी किंवा कंपनीला 18 टक्के जीएसटी भरावा लागेल. भाडेकरूला जीएसटी भरावा लागेल.

Advertisement

जर कोणत्याही कंपनीने आपल्या कर्मचार्‍यांसाठी निवासस्थानाची व्यवस्था करण्यासाठी एखादा निवासी फ्लॅट घेतला असेल आणि त्या फ्लॅटच्या मालकाची जीएसटीमध्ये नोंदणी केली नसेल, तर यामुळेदेखील सदर कंपनीला त्या फ्लॅटच्या भाड्यावर 18 टक्के जीएसटी द्यावा लागणार आहे, अशी माहीती आहे.

जर घरमालक आणि भाडेकरू दोघेही जीएसटी अंतर्गत नोंदणीकृत नसतील, तर अशा वेळी भाड्यावर जीएसटीचा हा नियम लागू होणार नाही.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 http://play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement