SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य: तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या..

मेष (Aries): नोकरी संदर्भातील प्रस्ताव लक्षात घ्या. कौटुंबिक गोडी वाढवाल. मित्रांशी वादाचे प्रसंग येऊ शकतात. मुलांचे वागणे मनाविरुद्ध वाटू शकते. जमिनीच्या कामात अधिक वेळ जाईल. हुशारीने वागा. दादागिरी टाळा. इतरांचेही ऐकण्याची सवय अंगी बाळगा. तज्ज्ञांचा सल्ला फायद्याचा ठरेल. नेतृत्वाची संधी मिळेल. इतरांवर प्रभाव टाकाल. दिवस चांगला आहे. अति विचार करण्यात वेळ वाया जाईल.

वृषभ (Taurus): तुमच्यातील खेळकरपणा वाढेल. घरगुती गोष्टींमध्ये अधिक लक्ष घाला. इतरांना आपल्याकडे आकर्षित कराल. शैक्षणिक क्षेत्रात नव्या आव्हानांना सामोरे जावे लागेल. काही अडचणी जाणवतील. डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवून काम करावे लागेल. आर्थिक नियोजनावर भर देणे आणि अनावश्यक खर्च टाळून बचत करण्यावर भर देणे आवश्यक आहे.

मिथुन (Gemini) : आध्यात्मिक गोष्टींकडे मन वळवा. महत्त्वाची कागदपत्रे पुढे सरकतील. सरकारी कामांना गती येईल. विशाल दृष्टीकोन बाळगाल. जोडीदाराशी खटके उडू शकतात. कतृत्वाच्या जोरावर प्रगती कराल. प्रतिष्ठा वाढेल. कौतुक होईल. कष्ट वाढतील पण आर्थिक लाभ होईल. कौतुक होईल. प्रतिष्ठा वाढेल. मान वाढेल. तब्येत जपा. खर्चांवर नियंत्रण ठेवणे आणि वाद टाळणे हिताचे. दिवस बरा जाईल.

कर्क (Cancer) : निर्णयावर ठाम राहावे. संपूर्ण विचारांती काम हाती घ्यावे. कामाचे चढउतार लक्षात घ्या. नसत्या गोष्टींच्या मागे लागू नका. गप्पा गोष्टींची आवड पूर्ण होईल. वाद टाळणे हिताचे. माणसांशी जुळवून घेणे फायद्याचे. संघर्ष टाळणे आणि सावध राहणे गरजेचे. दिवस बरा जाईल. इतरांवर प्रभाव टाकाल. बोलताना शब्द जपून वापरा. दिवस आपल्या मनाप्रमाणे व्यतीत कराल. आवडत्या गोष्टी करण्याकडे अधिक कल राहील.

Advertisement



सिंह (Leo) : नोकरदार व्यक्तींना थोडा दिलासा मिळेल. जवळचा प्रवास कराल. भावंडांशी संबंध सुधारतील. आवडता छंद जोपासाल. कामात वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. प्रकृतीकडे लक्ष द्या. जास्त पैसे खर्च करण्यावर नियंत्रण ठेवा. प्रिय व्यक्तीला वेळ द्या. कामाच्या बाबत हलगर्जीपणा करु नका. परिवारासंबंधित कामे पूर्ण करा. प्रकृतीकडे लक्ष द्या आणि वेळेवर आजाराचे निदान करा. जुन्या मित्रांची भेट होण्याची शक्यता आहे. प्रिय व्यक्तीशी वाद घालणे टाळा.

कन्या (Virgo) : हाती घेतलेल्या कामाला गती येईल. नवीन लोकांच्या संपर्कात याल. जोडीदाराबाबत समाधानी असाल. सामुदायिक बाबींचा फार विचार करू नका. आवडीचे पदार्थ चाखाल. आजचा दिवस तुम्हाला आनंदात घालवता येणार आहे. मित्रपरिवारासह वाद घालणे टाळा. प्रिय व्यक्तीकडून आनंदाची बातमी मिळेल. आई-वडिलांकडून साथ लाभेल.

तुळ (Libra) : कामाचा वेग वाढेल. तुमची चिकाटी सर्वांच्या नजरेत येईल. चारचौघात कौतुकास पात्र व्हाल. सामाजिक क्षेत्रातील लोकांना प्रतिष्ठा लाभेल. तब्येतीची काळजी घ्यावी. आज प्रेमप्रकरणी चुका होणार नाही याची दक्षता घ्या. घरातील मंडळींचे आदेश पाळा. ताणतणाव कमी करण्यासाठी स्वत:ला वेळ द्या. विचारपूर्वक वागा. घरातील ताणतणामुळे त्रास होण्याची शक्यता आहे. मित्रपरिवारासह वेळ घालवा.

वृश्‍चिक (Scorpio) : समजूतदारपणे विचार करावा. बोलतांना सारासार गोष्टी लक्षात घ्याव्यात. आवश्यकता असेल तरच खर्च करावा. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. घरासाठी नवीन खरेदी कराल. खोट्या प्रतिष्ठेला बळी पडू नका. कायदा नियम पाळा. वाद टाळणे हिताचे. माणसांशी जुळवून घेणे फायद्याचे. आर्थिक योजनांमध्ये पैसे गुंतवा. मित्रपरिवारासह आदराने वागा. घरातील मंडळींची साथ लाभेल. विचारपूर्वक निर्णय घ्या.

Advertisement


धनु (Sagittarius) : कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे राहील. जोडीदाराचे मत विचारात घ्यावे. कामातील त्रुटी भरून काढाव्यात. अतिहट्ट बरा नाही. वैचारिक स्थिरता जपावी. नेतृत्व करण्याची तसेच महत्त्वाचे निर्णय घेण्याची संधी मिळेल. ही संधी साधून आपण स्वतःचे स्थान आणखी बळकट करू शकाल. लोखंड, तेल, दारू या क्षेत्रांशी संबंधित व्यवसायात असलेल्यांची भरभराट होईल. रखडलेली कामं पूर्ण होतील.

मकर (Capricorn) : संघर्षमय स्थिती टाळावी. मनातील इच्छा पूर्ण होईल. जवळचे मित्र भेटतील. पारंपरिक कामातून यश मिळेल. व्यावसायिक अडचणींकडे अधिक लक्ष द्या. खर्च वाढण्याची आणि तब्येतीच्या कुरबुरी सुरू होण्याची शक्यता आहे. आर्थिक नियोजनावर भर देणे आणि अनावश्यक खर्च टाळून बचत करण्यावर भर देणे आवश्यक आहे. नियम कायदे पाळणे आवश्यक आहे. दुखापतीचा धोका आहे, काळजी घ्यावी.

कुंभ (Aquarious) : दुर्लक्षितपणे वागून चालणार नाही. कामाच्या बाबतची स्थिती आवाक्यात येईल. आपल्या मतावर ठाम राहाल. सर्वांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न कराल. रेस, जुगार यातून लाभ संभवतो. हितचिंतकांशी बातचीत करुन निर्णय घेणे हिताचे. आर्थिक नियोजन आणि कामाचे नियोजन करणे लाभाचे. दिवस चांगला जाईल. मित्र मंडळीची गाठभेट होण्याची शक्यता आहे. मानसिक चंचलता जाणवेल.

मीन (Pisces) : भागीदारीत गुंतवणूक कराल. योग्य ठोकताळ्याचा वापर करावा. क्रोधावर नियंत्रण ठेवा. प्रेमात सावध राहा. लग्न होण्यास विलंब होण्याची शक्यता आहे. अहंकार आणि क्रोधावर नियंत्रण ठेवा. संयम राखा. चुकीच्या मार्गाचा वापर करुन झटपट लाभ मिळविणे टाळा. खाण्यावर नियंत्रण ठेवा. तंदुरुस्त राहण्यासाठी दररोज व्यायाम करा. घरातील मंडळींचे विचार पटणार नाहीत. परंतु त्या विचारांचे पालन करुन योग्य ती कृती करा.

Advertisement