SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आता सर्व मोबाईलला एकच चार्जर? केंद्र सरकार घेणार मोठा निर्णय..

युरोपातील अनेक देशांमध्ये एक डिव्हाईस-एक चार्जरची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहे. भारतात, डिव्हाइस-चार्जर किंवा कॉमन चार्जर बद्दल अजूनतरी कोणी तक्रार करताना दिसून येत नाही. पण माणसाच्या इतर गरजांप्रमाणे मोबाईलसह चार्जर (Mobile Charger) सुद्धा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. म्हणून भारत सरकार कॉमन चार्जरबद्दल (Common Charger) विचार करत आहे.

आपण आजकाल नवीन घेतलेल्या स्मार्टफोन्सला टाईप-सी चार्जर येते. पण काही थोडेफार जुने मोबाईल असतील किंवा इतर डिव्हाईस असतील त्यांना वेगळे चार्जर असतात. अशा वेगळेपणामुळे बाहेर असल्यास आपल्यासोबत चार्जर नसल्यास चार्जर उपलब्ध असूनही ते मोबाईलला बसत नसल्यास अनेक जणांना अडचणींचा सामना करावा लागतो. आता हा त्रास कायमचा संपू शकतो. कारण आता यापुढे अनेक मोबाईल कंपन्यांच्या मोबाईलसाठी एकच चार्जर वापरात यावे, यासाठी केंद्र सरकार एकसमान चार्जर आणण्याचा निर्णय घेऊ शकते.

Advertisement

सध्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या मोबईलचे चार्जर देखील वेगवेगळे आहेत. यामुळे सर्व प्रकारच्या मोबाईलसाठी एकाच डिझाइनचा चार्जर असावा याची तयारी केंद्र सरकार करत आहे. एका रिपोर्टनुसार, केंद्र सरकारने 17 ऑगस्ट रोजी एक बैठक आयोजित केली असून तंत्रज्ञान क्षेत्रातील आणि ग्राहक मंत्रालयाचे अधिकारी त्या बैठकीत सहभागी होणार आहेत. या बैठकीत कॉमन चार्जर या विषयावर चर्चा होऊ शकते. यासाठी सरकारने उद्योगांना पत्र लिहून 17 ऑगस्ट रोजी बैठक बोलावलं असल्याची माहीती आहे.

माहीतीनुसार, इलेक्ट्रॉनिक गॅझेट दोन प्रकारात विभागून त्यांच्यासाठी एकसमान सामान्य चार्जर ठेवता येईल का या विषयावर बैठकीत मतं मांडली जाऊ शकतात. देशात होणारा ई-कचरा कमी होण्यासाठी मोबाईल फोनसोबतच, हेडफोन्स, स्मार्टवॉच, इअरबड्स, हेल्थ गॅजेट्स आणि स्पीकर अशा लहान किंवा मध्यम आकाराच्या गॅझेट्ससाठी एक प्रकारची चार्जिंग सिस्टीम असणं आता गरजेचं वाटू लागलं आहे. म्हणून टाईप-सी चार्जर (Type-C Charger) असावा. लॅपटॉप आणि टॅबसारख्या गॅझेटसाठी एकसमान चार्जर उपलब्ध करुन देण्याची योजना आखली जाऊ शकते, अशी माहीती आहे. या विषयावर चर्चा करण्यासाठी सरकारने 17 ऑगस्टला महत्त्वाची बैठक बोलावली आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 http://play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement