SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

वाहनधारकांसाठी खुशखबर..!! ‘सीएनजी’-‘पीएनजी’च्या किंमती कमी होणार..?

गेल्या काही दिवसांपासून इंधन दरात सातत्याने वाढ होतेय.. त्यामुळे नागरिकांचा कल ‘सीएनजी’, ‘पीएनजी’ वाहनांकडे वळला आहे.. मात्र, वापर वाढला, तसा ‘सीएनजी’ व ‘पीएनजी’ गॅसच्या दरातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली.. वाढत्या महागाईमुळे वैतागलेल्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर येत आहे..

‘सीएनजी’-‘पीएनजी’ वाढत्या किंमतीला आळा घालण्यासाठी मोदी सरकार लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. लोकांना दिलासा देण्यासाठी सरकार मोठ्या इंडस्ट्रिज किंवा उद्योगांकडून काही प्रमाणात नैसर्गिक गॅस घेणार असून, शहरात गॅस वितरण कंपन्यांना त्याचे वाटप केले जाणार आहे.. त्यामुळे या दोन्ही गॅसच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे..

Advertisement

कंपन्यांना घरगुती गॅसचे वाटप वाढवणार

याबाबत केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने अधिसूचना जारी केली आहे.. त्यात पूर्वीच्या आदेशात सुधारणा करण्याचं स्पष्ट केलं आहे. सरकारकडून आता गॅस वितरण करणाऱ्या कंपन्यांना घरगुती उत्पादित गॅसचे वाटप वाढवलं जाणार असल्याचे या अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आलं आहे..

Advertisement

दिल्लीच्या इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड (IGL), तसेच मुंबईच्या महानगर गॅस लिमिटेड (MGL) सारख्या शहरांमधील गॅस वितरण कंपन्यांसाठी गॅसचे वाटप 17.5 दशलक्ष घनमीटर प्रतिदिन वरून 2.078 दशलक्ष घनमीटर केले आहे. उपलब्धतेच्या आधारे, किंवा ‘सीएनजी’-‘पीएनजी’च्या वाहतुकीसाठी केलेल्या वाटपाच्या आधारे शहर गॅस वितरक कंपन्यांना घरगुती गॅसचा पुरवठा केला जाईल, असं अधिसूचनेत नमूद केलं आहे..

सध्या शहर गॅस वितरक कंपन्यांना केल्या जाणाऱ्या वाटपातून 83 टक्के मागणी पूर्ण केली जाते. उर्वरित पुरवठ्यासाठी ‘एलएनजी’ चढ्या दराने आयात केला जात होता. त्यामुळे ‘सीएनजी’-‘पीएनजी’ गॅसच्या किमतीही वाढल्या आहेत. मात्र, सरकारकडून वाटप वाढल्यानंतर या कंपन्या 94 टक्के मागणी पूर्ण करू शकतील, असे सांगितले जात आहे..

Advertisement

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मुंबईतच ‘सीएनजी’च्या दरात प्रती किलो 6 रुपये, तर ‘पीएनजी’च्या दरात 4 रुपये प्रति यूनिट वाढ झाली होती. त्यामुळे मुंबईत ‘सीएनजी’ची किंमत 49.40 पैसे प्रति किलोवरुन वाढून 86 रुपये प्रतिकिलो इतकी झाली. दिल्लीतही इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडने ‘सीएनजी’ किंमतीत 4 रुपये प्रतिकिलो वाढ केल्याने त्याचे दर 75.61 पैसे झाले आहेत.

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement