SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

शिखर धवनला ‘बीसीसीआय’चा दणका, झिम्बाव्बे दौऱ्यापूर्वी मोठा निर्णय..

भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी महत्वाची बातमी आहे.. वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर भारतीय संघ 18 ऑगस्टपासून झिम्बाव्बे दौऱ्यावर जाणार आहे.. या दौऱ्यासाठी भारतीय संघाची धुरा शिखर धवन याच्यावर सोपवण्यात आली होती, पण आता ‘बीसीसीआय’ने त्याला दणका देताना वेगळा निर्णय घेतला आहे..

झिम्बाव्बे दौऱ्यासाठी टीम इंडियाचा कॅप्टन केलेल्या शिखर धवनची आता उचलबांगडी करण्यात आली आहे. आता त्याच्या जागी के. एल. राहुल हा भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे.. याबाबत ट्विट करताना ‘बीसीसीआय’ने (BCCI) घोषणा केली. त्यामुळे झिम्बाव्बे दौऱ्यात आता धवनला राहुलच्या नेतृत्वाखाली खेळावे लागणार आहे..

Advertisement

गेल्या काही दिवसांपासून के. एल. राहुलच्या फिटनेसबाबत प्रश्न उपस्थित केले जात होते. काही दिवसांपासून तो बंगळुरुतील ‘एनसीए’मध्ये फिटनेसवर काम करीत होता. आता तो पूर्णपणे तंदुरुस्त झाल्याचं सांगण्यात येतंय. त्यामुळे पुन्हा एकदा संघाची धुरा राहुलच्या खांद्यावर टाकण्यात आली आहे.

झिम्बाव्बे दौऱ्यानंतर भारतीय संघाला आशिया चषक स्पर्धा खेळायची आहे.. या मोठ्या स्पर्धेपूर्वीच राहुल फिट झाल्याने भारतीय संघाला मोठा दिलासा मिळाला आहे.. त्यानंतर लगेच त्याची झिम्बाब्वे दौऱ्यासाठी निवड करताना, त्याच्यावरच नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.. ‘बीसीसीआय’ने गुरुवारी संध्याकाळी ट्विट करुन याबाबतची माहिती दिली..

Advertisement

विशेष म्हणजे, 30 जुलै रोजी ‘बीसीसीआय’ने झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड केली. त्यात राहुलचं नाव नव्हतं. संघाची धुरा शिखर धवनकडे सोपवण्यात आली होती. मात्र, 10 दिवसांतच राहुलकडे कर्णधारपद सोपवण्यात आल्याने धवनचे चाहते नाराज झाले आहेत. झिम्बाब्वे दौऱ्यासाठी शिखर धवनकडे उपकर्णधारपद देण्यात आलंय.

भारत विरुद्ध झिम्बाव्बे यांच्यातील वन-डे मालिकेला 18 ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. 20 ऑगस्टला दुसरा, तर 22 ऑगस्टला तिसरा व शेवटचा वन-डे सामना खेळला जाणार आहे.. या दौऱ्यासाठी ‘बीसीसीआय’ने युवा खेळाडूंना संधी देताना, वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली आहे..

Advertisement

भारतीय संघ – केएल राहुल (कर्णधार), शिखर धवन (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, दीपक चाहर.

मालिकेचं वेळापत्रक

Advertisement
सामना कधी ठिकाण
पहिला एकदिवसीय सामना 18 ऑगस्ट 2022 हरारे स्पोर्ट्स क्लब
दुसरा एकदिवसीय सामना 20 ऑगस्ट 2022 हरारे स्पोर्ट्स क्लब
तिसरा एकदिवसीय सामना 22 ऑगस्ट 2022 हरारे स्पोर्ट्स क्लब

 

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement