SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

शिवसेना कोणाची..? ठाकरे गटाला निवडणूक आयोगाकडून मोठा धक्का..!!

राज्यातील सत्तासंघर्षावरील सर्वोच्च सुनावणी लांबणीवर पडल्याने शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाला होता.. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.. शिवसेनेच्या ‘धनुष्यबाण’ चिन्हावरील वादावर केंद्रीय निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला केवळ 15 दिवसांची मुदत दिली आहे…

शिवसेना कोणाची, हा वाद सध्या सुप्रीम कोर्टात सुरू आहे.. त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा निकाल येईपर्यंत ‘धनुष्यबाण’ चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने कोणताही निर्णय घेऊ नये, अशी विनंती ठाकरे गटाने केली होती. तसेच कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे चार आठवड्यांची मुदत मागितली होती..

Advertisement

ठाकरेंकडे 23 ऑगस्टपर्यंत वेळ

केंद्रीय निवडणूक आयोगाने ठाकरे गटाची मागणी धुडकावून लावताना, केवळ दोन आठवडे, म्हणजेच 15 दिवसांची मुदत दिली आहे. त्यानुसार, ठाकरे गटाला आता सर्व पुराव्यांशी बाजू मांडण्यासाठी फक्त 23 ऑगस्टपर्यंत वेळ असणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या अडचणी आणखी वाढ होण्याची दाट शक्यता आहे.

Advertisement

निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे ठाकरे गटाला 23 ऑगस्टपर्यंत आपलं म्हणणं मांडावंच लागेल. त्याआधी 22 ऑगस्टला सुप्रीम कोर्टात सत्तासंघर्षावरील सुनावणी होणार आहे. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी 23 ऑगस्टपर्यंत निवडणूक आयोगासमोर कागदपत्रे सादर करावे लागतील.. त्यामुळे ठाकरे गटासाठी हे दोन दिवस अत्यंत महत्वाचे असणार आहेत..

खासदार, आमदारानंतरही शिवसेनेच्या राजकीय पक्ष रचनेतही आपलं प्राबल्य असल्याचा दावा शिंदे गटाने केला आहे. तशी आकडेवारीही निवडणूक आयोगासमोर मांडली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 19 जुलै 2022 रोजी निवडणूक आयोगाला पत्र लिहून त्यांच्या नेतृत्वाखालील गटाला ‘शिवसेना’ म्हणून मान्यता द्यावी, तसेच ‘धनुष्यबाण’ चिन्ह मिळावं, अशी मागणी केली आहे..

Advertisement

शिवसेना कोणाची, हा वाद केंद्रीय निवडणूक आयोगासमोर असून, आयोगाच्या निर्णयावर उद्धव ठाकरे व शिंदे गटाचेही भविष्य ठरणार आहे.. त्यामुळे निवडणूक आयाेगाच्या निर्णयाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे..

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement