SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

शालेय पोषण आहारापासून ‘हे’ विद्यार्थी राहणार वंचित, शिक्षण विभागाचे निर्देश..!!

प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या पटसंख्या वाढावी, तसेच शालाबाह्य विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी केंद्र सरकारमार्फत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषण आहार योजना (Poshan Aahar scheme) राबविण्यात येते. स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी अनुदानित व अंशत: अनुदानित शाळा, वस्तीशाळा, महात्मा फुले शिक्षण हमी योजना केंद्रांतील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळतो..

सरकारच्या वित्त विभागाच्या निर्णयानुसार, वैयक्तिक लाभाच्या योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाभार्थ्यांचा माहितीसाठा (डेटाबेस) तयार करून तो आधार कार्डशी (Aadhar card) जोडला जाणार आहे. शालेय पोषण आहार योजनेचाही त्यात समावेश आहे.. त्यामुळे विद्यार्थ्यांचे आधार कार्ड पोषण आहार योजनेशी लिंक करण्याची मोहीम राबवण्यात येत आहे..

Advertisement

शालेय पोषण आहार योजनेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांना डिसेंबर-2022 पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे निर्देश शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत. पात्र सर्व शाळांतील लाभार्थ्यांची आधार कार्ड नोंदणी पूर्ण झालेली असणं आवश्यक आहे. मात्र, अनेक विद्यार्थ्यांनी आधार कार्ड काढलेले नाही.. त्यामुळे विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढण्याचे काम शिक्षकांना करावे लागत आहे.

…तर पोषण आहार होणार बंद..!

Advertisement

विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणीसाठी कालबद्ध कार्यक्रम राबवला जात आहे.. दर महिन्याच्या 28 तारखेपर्यंत विद्यार्थ्यांची माहिती सादर करण्याची सूचना प्राथमिक शिक्षण संचालनालयाने शिक्षणाधिकाऱ्यांना केली आहे. त्यामुळे आधार कार्ड लिंक करण्याच्या कामाला सध्या वेग आला आहे..

राज्यातील शासकीय व अनुदानित शाळांमध्ये आधार कार्ड असलेल्या विद्यार्थ्यांनाच आता शालेय पोषण आहाराचा लाभ दिला जाणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी 1 जानेवारी 2023 पासून केली जाणार असल्याचे सांगण्यात आले..

Advertisement

शालेय शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार, विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढण्याचे काम शिक्षक करीत असले, तरी त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.. विद्यार्थ्यांचे कागदपत्रे अपूर्ण असणे, विद्यार्थ्यांच्या बोटांचे ठसे न उमटणे, अशा तांत्रिक अडचणी येत असल्याचे मुख्याध्यापक महामंडळाचे राज्य प्रवक्ते महेंद्र गणपुले यांनी सांगितले..

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement