SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘होंडा’ची जबरदस्त बाईक लाॅंच, आकर्षक डिझाईन नि भन्नाट फीचर्स..!!

बाईकप्रेमींसाठी महत्वाची बातमी आहे.. जपानी दुचाकी उत्पादक कंपनी असलेल्या ‘होंडा’ने भारतीय बाजारात बाईकचे दोन जबरदस्त माॅडेल लाॅंच केले… भारतीय ग्राहकांना, विशेषत: तरुणाईला डोळ्यासमोर ठेवून ‘होंडा’ कंपनीने ही बाईक बाजारात सादर केली आहे..

होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया कंपनीने भारतात नवीन प्रीमियम बाइक ‘होंडा सीबी 300 एफ’ (Honda CB 300F) लाँच केली. कंपनीच्या ‘बिग विंग’ डीलरशिप, तसेच वेबसाइटवर जाऊन ग्राहकांना ही बाईक बुक करता येईल.. कंपनीने ही बाइक दोन व्हेरिएंट्समध्ये सादर केलीय.. त्यात ‘डिलक्स’ (Deluxe) व ‘डिलक्स प्रो’ (Deluxe Pro) या मॉडेलचा समावेश आहे.

Advertisement

बाईकची वैशिष्ट्ये

 • कंपनीच्या दोन्ही बाइक्समध्ये मॅट अॅक्सिस ग्रे मेटॅलिक, मॅट मार्वेल ब्लू मेटॅलिक व स्पोर्ट्स रेड असे तीन रंगांचे पर्याय दिले आहेत.
 • दोन्ही प्रीमियम बाइक्समध्ये सारखंच 293.5 सीसी क्षमतेचं इंजिन असेल.. 4 स्ट्रोक, 4 व्हॉल्व, एसआय, ऑईल कूल्ड इंजिन दिलं आहे. बाइकचं इंजिन 7750 आरपीएमवर 18kw पॉवर व 5550 आरपीएमवर 25.6 न्युटन मीटर टॉर्क जनरेट करू शकतं.
 • या बाईकमध्ये स्लिप आणि असिस्ट क्लचसह 6 स्पीड गिअर बॉक्स असतील.
 • बाईकला 5 स्टेप अॅडजस्टेबल मोनो-शॉकसह ‘गोल्ड’ USD फॉर्क्स अपफ्रंट मिळेल.
 • समोर 276mm वर आणि मागील बाजूस 220mm डिस्कमधून ड्युअल चॅनेल ABS सह स्टॉपिंग फोर्स मिळेल.
 • बाइकची लांबी 2084 मिमी, रुंदी 765 मिमी, तर उंची 1075 मिमी आहे. बाइकचा व्हीलबेस 1390 मिमी, ग्राऊंड क्लीअरन्स 171 मिमी आहे.
 • बाइकच्या सीटची लांबी 614 मिमी इतकी आहे. बाइकचं कर्ब वेट 153 किलो आहे.
 • बाइकचं रिअर व्हील ट्रॅक्शन मेन्टेन करण्यासाठी ‘होंडा सिलेक्टेबल टॉर्क कंट्रोल’ फीचर दिलं आहे.
 • तसेच, यात ‘होंडा स्मार्ट व्हॉईस कंट्रोल सिस्टिम’ दिली आहे. बाइकमध्ये फुल डिजिटल मीटर असेल, त्यावर ‘रियल टाईम’ सर्व माहिती मिळेल.

किंमत

Advertisement
 • होंडा सीबी 300F Deluxe  – 2,25,900 रुपये
 • होंडा सीबी 300F Deluxe Pro – 2,28,900 रुपये

बाईकच्या सर्व बाजूंनी ‘एलईडी’ दिवे, तसेच संपूर्ण ‘डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर’ दिले आहे. त्यात ‘होंडा रोडसिंच’ (Honda RoadSync) फीचर असून, ‘ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी’द्वारे ते अनेक कामे करील.. तुम्ही कॉल, मेसेज, संगीत, नेव्हिगेशन आणि हवामानाची माहितीही मिळवू शकता. हँडलवरील स्विचसह ते ऑपरेट केले जाऊ शकते.

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement