SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आता येणार इलेक्ट्रिक बुलेट, एका चार्जिंगमध्ये धावणार 100 किमीपेक्षा जास्त..?

मागील काही दशकांपासून गावागावांत आणि शहरांत धकधक करणाऱ्या रॉयल एनफील्ड बुलेटने खुशखबर आणली आहे. ती आता नव्या अवतारात येणार असल्याची माहीती आहे. सध्या कंपनी अनेक नवनवीन मॉडेल बाजारात घेऊन येत आहे. अलीकडेच स्क्रॅम 411, न्यू क्लासिक 350 सह 7 ऑगस्टला आतापर्यंतची सर्वात स्वस्त येणारी हंटर 350 या नवीन बुलेटचं डिझाईन लाँच केल्याचं दिसलं.

पेट्रोल-डिझेलचे वाढते दर आणि महागाईमुळे सामान्यांचा खिसा आता खर्चासाठी मागे सरणारा दिसत आहे. वाढत्या महागाईमुळे अनेक मोटार कंपन्याही इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीकडे वळत आहे. यामुळेच इलेक्ट्रिक वाहने आणि त्याचे फायदे बघता हेच भविष्य आहे, असे तज्ज्ञ म्हणतात.
याच अंदाजाने हंटर 350 बुलेटच्या डिझाइन लाँचवेळी झालेल्या कार्यक्रमात रॉयल एन्फिल्डचे CEO सिद्धार्थ लाल यांनी कंपनी येत्या काही महिन्यांत बाजारात Royal Enfield Electric Bullet लॉंच करणार असल्याचे संकेत दिले आहेत.

Advertisement

जगात आणि भारतात छोट्या-मोठ्या इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात सर्वच बड्या कंपन्या नवनवीन मॉडेल आणत आहेत. आता रॉयल एन्फिल्डने जर आपली इलेक्ट्रिक बुलेट लाँच केली तर वैशिष्ट्ये काय असतील आणि कोणती खास बाब लोकांना आवडेल, रेंज किती मिळेल अशी माहीती जाणून घेऊयात..

सिद्धार्थ लाल यांनी दिलेल्या माहीतीनुसार..

Advertisement

▪️ 350cc – 650cc च्या पॉवरच्या इलेक्ट्रिक बुलेट तयार करणे महाग ठरू शकते. साधारण 20-30bhp पॉवरच्या बॅटरीसाठी तंत्रज्ञान तयार करावं लागू शकतं.
▪️ बॅटरी बाहेरील देशातून आयात करण्यापेक्षा आपल्या देशात स्थानिक स्तरावर ही बॅटरी बनवण्याचे काम केले जाईल.
▪️ रॉयल एनफील्डच्या आगामी बुलेटच्या इलेक्ट्रिक मॉडेलमध्ये एकदा चार्जिंग केल्यावर 100 ते 150 किमी पर्यंत प्रवास करण्याची क्षमता असू शकते.

रॉयल एन्फिल्डच्या या इलेक्ट्रिक वाहनाची डिझाईन तयार करण्याचं काम सुरू असून यामध्ये ग्राहकांची सुरक्षितता व बुलेटचा क्लासिक लुक यांना प्राधान्य देऊन काही बदलही वारंवार होऊ शकतात आणि दमदार इंजिनसह पूर्ण प्लॅनिंग करूनच नवी कोरी इलेक्ट्रिक बुलेट लॉंच करण्याची तयारी केली जाईल. त्यांनी सांगितलं की, कंपनीच्या मते गुणवत्तेला सर्वाधिक प्राधान्य आहे, असं ते म्हणाले.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 http://play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement