SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘महिंद्रा’ची ‘सीएनजी’वरील गाडी लाॅंच, स्वस्तात मस्त नि मायलेज जबरदस्त..!!

सध्या इंधन दरवाढीमुळे नागरिकांचा कल ‘सीएनजी’ किंवा इलेक्ट्रिक वाहनांकडे वळला आहे.. नागरिकांची मागणी लक्षात घेऊन ऑटो कंपन्याही अशा वाहनांची निर्मिती करू लागल्या आहेत. आता त्यात व्यावसायिक कारणांसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांचीही भर पडल्याचे दिसत आहे..

भारतातील दिग्गज वाहन उत्पादक कंपन्यांपैकी एक असलेल्या ‘महिंद्रा अँड महिंद्रा’ कंपनीने भारतीय बाजारात नुकतेच आपले ‘कमर्शियल’ वाहन लाँच केलंय. ‘जीतो प्लस 400 (Jeeto Plus CNG 400) सीएनजी’ असं या गाडीचं नाव आहे.. या वाहनात सेगमेंटचा सर्वोत्तम पेलोड, रेंज व मायलेज मिळणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

Advertisement

‘जीतो प्लस 400’ची वैशिष्ट्ये

  • ‘महिंद्रा’ कंपनीने या गाडीत 2 ‘सीएनजी’ टाक्या दिल्या आहेत. एक टाकी 40 लिटर, तर दुसरी टाकी 28 लिटरची आहे. या दोन्ही टाक्यांची एकूण क्षमता 68 लिटर आहे.
  • पूर्ण टँक भरल्यानंतर ही गाडी 400 किलोमीटरपेक्षा जास्त मायलेज देईल, असा कंपनीचा दावा असून, त्यामुळेच या गाडीला ‘सीएनजी 400’ असं नाव दिलंय. म्हणजेच 35.1 किमी प्रति किलो मायलेज मिळेल.
  • गाडीची पेलोड क्षमता 650 किलो आहे. इतर पिकअपपेक्षा 30 टक्के जास्त बचत मिळणार असल्याचा कंपनीचा दावा आहे.
  • गाडीत एक पॉवरफुल इंजिन दिलं असून, हे इंजिन 1600-2200 आरपीएमवर 15 किलोवॅट पीक पॉवर व 44 एनएम पीक टॉर्क जनरेट करते.
  • ही गाडी 3 वर्षे / 72000 किमीच्या वॉरंटीसह सादर केली आहे. गाडीचा मेन्टेनन्स खर्च फक्त 0.22 रुपये प्रति किमी आहे.
  • गाडीत कारसारखी फिचर्स दिले आहेत. उत्तम हेडरूम व लेगरूमसह मोठी केबिन, विशेषत: लांब पल्ल्याचा प्रवास आनंददायी बनवण्यासाठी आरामदायी आसनं दिली आहेत.

किंमत – या गाडीची किंमत फक्त 5.26 लाख (एक्स शोरूम) इतकी आहे.

Advertisement

दरम्यान, सध्या कमर्शिअल वाहनांच्या सेगमेंटमध्ये बोलायचे झाल्यास, ‘टाटा मोटर्स’नंतर ‘महिंद्रा’ कंपनी दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे दिसते.. जुलै 2022 मध्ये या कंपनीने आपल्या 16,478 युनिट्सची विक्री केल्याचे आकडेवारी सांगते.

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement