SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

ब्रेकींग: अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं निधन, चित्रपट सृष्टीवर शोककळा..

मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेते प्रदीप पटवर्धन (Pradip Patwardhan) यांचं आज (9 ऑगस्ट) निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. आपल्या आभिनयाची प्रेक्षकांवर छाप पाडून मराठी चित्रपटसृष्टीत, नाट्यसृष्टीत आदरानं घेतलं जाणारं नाव म्हणजे प्रदीप पटवर्धन. आज वयाच्या 65व्या वर्षी त्यांनी मुंबईतील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला.

अभिनेते प्रदीप पटवर्धन यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती आहे. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने 65 व्या वर्षी त्यांनी राहत्या घरी (झावबावाडी, चर्नी रोड ) अखेरचा श्वास घेतला. प्रदीप पटवर्धन अभिनेते बनायची सुरुवात बालपणापासूनच झाली होती. कॉलेजमध्ये या महान कलाकाराने बऱ्याच स्पर्धा गाजवल्या. चित्रपट, नाटक आणि मालिकांमधून प्रदीप हे प्रेक्षकांचे अफलातून मनोरंजन करत होते.

Advertisement

मराठी सिनेसृष्टीवर आता शोककळा पसरली असून या अभिनेत्याने लावू का लाथ, भुताळलेला, जमलं हो जमलं, एक फुल चार हाफ (1991), डान्स पार्टी (1995), मी शिवाजीराजे भोसले बोलतोय (2009), गोळा बेरीज (2012) आणि बॉम्बे वेल्वेट (2015), नवरा माझा नवसाचा या चित्रपटांमध्ये त्यांचा कमालीचा अभिनय पाहायला मिळाला. तर होल्डिंग बॅक, मेनका उर्वशी, थँक यू विठ्ठला, 1234 आणि पोलीस लाईन-एक पूर्ण सत्य यांसारख्या चित्रपटांची निर्मितीही त्यांनी केली होती. या अभिनेत्याला त्यावेळेस प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं.

मराठी रंगभूमी, चित्रपटसृष्टीत आपल्या निखळ, मोकळ्या स्वभावाने ओळख निर्माण करणारा हा अभिनेता आपण गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी या निखळत्या ताऱ्यास श्रद्धांजली अर्पण केली आहे. या अभिनेत्याच्या लक्षवेधी संवादफेक मुळे प्रेक्षकांच्या मनात कायम घर तर केलंच पण त्यांच्या जाण्याने आपल्या सहजसुंदर अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे सदाबहार अभिनेते गेल्याने मराठी चित्रनगरीत पोकळी निर्माण झाली आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 http://play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement