SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

बजाज प्लॅटिना 9 हजार रुपयांत मिळणार, ‘इथे’ सुरू आहे खास ऑफर..

बाईक (दुचाकी) म्हटलं की मायलेज आणि किंमत यावरून ठरतं की सामान्य लोकांना ती घायची की नाही. देशात मोठमोठ्या कंपन्यांनी (Hero, Honda, Bajaj, TVS) सामान्य लोकांना डोळ्यासमोर ठेवून कमी बजेटमध्ये सहज उपलब्ध होणाऱ्या दुचाकी आणल्यात. त्यांनी या क्षेत्रात उडी मारून आकर्षक आणि कमी बजेटमध्ये खरेदी करता येणाऱ्या आणि जास्त मायलेज देणाऱ्या बाईक्सची निर्मिती केली. यामुळे बजाज, टीव्हीएस, हिरो, होंडा यांसारख्या कंपन्यांच्या बाईक्सची संख्या आपल्या शेतीप्रधान देशात जास्तच आहे.

आता आपल्यालाही जर या नव्या कोऱ्या शोरूम बाईक्सचं बजेट जास्त वाटत असेल तर आपण एक काम नक्कीच करू शकतो. आपल्याकडे अँड्रॉइड मोबाईल असेल तर लगेच गूगल सर्च करण्यासाठी हव्या त्या बाईकचं मॉडेल टाकून समोर सेकंड हँड बाईक असं लिहा आणि सर्च करा. तुम्हाला शेकडो बाईक विकण्यासाठी आहेत असं तेथील वेबसाईट्सवर दिसेल. मग शोधा आणि आपल्या खिशाला परवडणारी बाईक किंमत व कागदपत्रे चेक करूनच बजेटनुसार खरेदी करा. असेच काही पर्याय आज आम्ही तुम्हाला Bajaj Platina या बाईकबद्दल देणार आहोत.

Advertisement

बजाज प्लॅटिनाची पहिली ऑफर CREDR वेबसाईटवर असून तिथे बाईकचे 2011 चे मॉडेल आणि सविस्तर माहीती दिली आहे. या ठिकाणी या बाईकची किंमत 16,490 रूपये दिलेली आहे. ही किंमत फिक्स असून ही बाईक जर तुम्ही खरेदी केली तर वेबसाईटवरून कोणतीही ऑफर किंवा फायनान्स प्लॅन असणार नाही. तुम्हाला वन टाईम पेमेंट करून ती खरेदी करावी लागेल.

बजाज प्लॅटिनाची दुसरी ऑफर प्रसिद्ध वेबसाईट QUIKR वर देण्यात आली आहे. इथे या बाईकचे 2009 चे मॉडेल विकण्यासाठी ठेवले असून फोटो बघून आपल्याला समजून जाईल. या बजाज प्लॅटिनाच्या मॉडेलची किंमत 9,999 रुपये ठेवली गेली आहे. इथे देखील बाईक खरेदी करताना कोणतीही ऑफर किंवा प्लॅन नसेल तुम्हाला एकदाच सर्व पैसे द्यावे लागतील.

Advertisement

सामान्यांना परवडणारी बजाज प्लॅटिनाची तिसरी ऑफर OLX वेबसाइटवरून आली आहे जिथे बजाज प्लॅटिनाचे 2011 चे मॉडेल पोस्ट केले आहे. इथे या बाईकची किंमत 11,500 रुपये ठेवली आहे आणि ती खरेदी करताना कोणतीही ऑफर किंवा प्लॅन तुम्हाला मिळणार नाही. किंमत कमी होण्यासाठी तुम्ही बाईकच्या मालकाशी चर्चा करून वैयक्तिक पातळीवर हा प्रश्न सोडवू शकता.

(सदर लेख इंटरनेटवर उपलब्ध माहीतीनुसार लिहिण्यात आला आहे. वरील ऑफर्समध्ये बाईक खरेदी करताना जोखिम ग्राहकांची स्वतःची असेल, किंमत व ऑफर तपासूनच खरेदी करा, त्या काही वेळेनंतर बदलत असतात.)
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 http://play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement