SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य: तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या..

मेष (Aries): परदेशातील नातेवाईकांकडून शुभ वार्ता मिळतील. दूरच्या प्रवासाचे बेत आखाल. प्रत्येक गोष्टीचा रसास्वाद घ्याल. जवळच्या मित्राची नाराजी दूर करावी. मधुर वाणीने सर्वांना जिंकून घ्यावे. विचारपूर्वक वागा. घरातील ताणतणामुळे त्रास होण्याची शक्यता आहे. आज वडील आणि तुम्ही सोबत वेळ घालवा. तुमची विचारसरणी सकारात्मक असेल. जर तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय चालवत असाल, तर विस्तार योजना अंमलात आणण्यासाठी ही चांगली वेळ आहे. मेहनतीला कमी पडू नका.

वृषभ (Taurus): संपर्कातील लोकांची मदत मिळेल. चारचौघांत कौतुकास पात्र व्हाल. बौद्धिक दृष्टिकोन ठेवून विचार कराल. घरातील स्वच्छतेबाबत दक्षता बाळगाल. बागकामाची आवड जोपासाल. आर्थिक योजनांमध्ये पैसे गुंतवा. मित्रपरिवारासह आदराने वागा. घरातील मंडळींची साथ लाभेल. विचारपूर्वक निर्णय घ्या. तुमच्या व्यवसायातील काम खूप दिवसांपासून रखडले असेल तर ते आज पूर्ण होऊ शकतात. निरोगी पर्याय निवडल्याने तुमचे आरोग्य चांगले राहील.

मिथुन (Gemini) : क्रोध वृत्तीला आवर घालावी. जोमाने कामे पूर्ण कराल. सारासारविचार करून वागणे ठेवा. स्वतंत्र वृत्तीचा आग्रह धराल. खाण्यावर नियंत्रण ठेवा. तंदुरुस्त राहण्यासाठी दररोज व्यायाम करा. घरातील मंडळींचे विचार पटणार नाहीत. परंतु त्या विचारांचे पालन करुन योग्य ती कृती करा. मित्र मंडळीची गाठभेट होण्याची शक्यता आहे. परीक्षा किंवा स्पर्धेच्या माध्यमातून नोकरी शोधत असतील किंवा ज्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांनी सतत प्रयत्न करावेत.

कर्क (Cancer) : आजचा दिवस चांगला जाईल. कामे अपेक्षित वेळेत पूर्ण होतील. उत्साह कमी पडू देऊ नका. नातेवाईकांशी मतभेदाचे प्रसंग येऊ शकतात. जवळच्या मित्रांचा गोतावळा जमवाल. आजच्या दिवसाची सुरुवात उत्तम होणार नाही, परंतु काळजीपूर्वक कामे केल्यास चुका होण्याची शक्यता टळेल. आई-वडिलांच्या प्रकृतीकडे लक्ष द्या. कार्यक्षेत्रात सहकार्‍यांसोबत काम करा. विशेष काळजी घ्या. सामाजिक सौहार्द आणि प्रतिष्ठा चांगली राहील.

Advertisementसिंह (Leo) : उगाचच मतभिन्नता दर्शवू नका. वादाच्या मुद्द्यापासून दूर राहावे. पोटाच्या तक्रारी वाढू शकतात. व्यापक दृष्टिकोन ठेवावा लागेल. सकारात्मक विचारांची जोड द्यावी. आज कंबर दुखी किंवा मानदुखीचा त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे असे झाल्यास दुर्लश्र करु नका. तसेच आजच्या दिवशी आराम केल्यास उत्तम. अचानक खर्च वाढू शकतो. घरात थोडे वादाचे वातावरण तयार होईल. आज आर्थिक लाभाच्या संधी मिळतील. काही नवीन ओळखीच्या लोकांकडून फसवणूक होऊ नये म्हणून हुशारीने काम करा.

कन्या (Virgo) : कौटुंबिक चर्चेला प्राधान्य द्यावे. घरात काही नवीन बदल करण्याचा विचार कराल. कामातून मनाजोगे समाधान लाभेल. आजचा दिवस उत्साहात जाईल. मित्र परिवारासह बाहेर जाण्यास वेळ काढा. कामे करताना घाईने निर्णय घेऊ नका. आई-वडिलांची साथ लाभेल. व्यापारी वर्गाने पैशांबाबत ग्राहकांशी वाद घालणे टाळावे. कामाशी संबंधित प्रत्येक लहानसहान गोष्टीकडे लक्ष द्या. कौटुंबिक जीवन ताणतणावांनी भरलेले असू शकते, परंतु तुम्हाला परिस्थितीला कुशलतेने सामोरे जावे लागेल.

तुळ (Libra) : लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. दिवस मध्यम फलदायी राहील. किरकोळ इजांकडे दुर्लक्ष करू नका. कलेचे कौतुक केले जाईल. नवीन लोक संपर्कात येतील. परिवारासंबंधित कामे पूर्ण करा. प्रकृतीकडे लक्ष द्या आणि वेळेवर आजाराचे निदान करा. जुन्या मित्रांची भेट होण्याची शक्यता आहे. प्रिय व्यक्तीशी वाद घालणे टाळा. आज आव्हानांना सामोरे जावे लागेल. पण शेवटी गोष्टी तुमच्या बाजूने होतील. आपले लक्ष दैनंदिन उपक्रमांवर केंद्रित करा आणि सकारात्मक संवाद स्थापित करण्यासाठी पावले उचला.

वृश्‍चिक (Scorpio) : नवीन कामातून समाधान मिळेल. जोडीदाराचा लाडिक हट्ट पुरवावा लागेल. वैवाहिक सौख्याने सुखावून जाल. छोट्या प्रवासाचे बेत आखाल. काही किरकोळ कौटुंबिक कटकटी राहतील. प्रकृतीकडे लक्ष द्या. जास्त पैसे खर्च करण्यावर नियंत्रण ठेवा. प्रिय व्यक्तीला वेळ द्या. कामाच्या बाबत हलगर्जीपणा करु नका. तरुणांना करिअरमध्ये मोठे यश मिळू शकते. खाण्याकडे विशेष लक्ष द्या, त्यामुळे तुमचे आरोग्य चांगले राहील. मित्र आणि कुटुंब तुम्हाला पूर्ण सहकार्य करतील.

Advertisementधनु (Sagittarius) : कौटुंबिक कामातून आनंद मिळेल. व्यवसायातून चांगला लाभ होईल. मनाजोगी खरेदी करता येईल. झोपेची काहीशी तक्रार जाणवेल. तब्येतीत सुधारणा होईल. आजचा दिवस तुम्हाला आनंदात घालवता येणार आहे. मित्रपरिवारासह वाद घालणे टाळा. प्रिय व्यक्तीकडून आनंदाची बातमी मिळेल. आई-वडिलांकडून साथ लाभेल. नशीब साथ देईल. गुंतागुंतीच्या समस्यांवर उपाय सापडतील. तुम्ही नवीन उपक्रमात प्रवेश कराल असे संकेत आहेत. परकीय संबंधांमुळे मोठे फायदे होतील आणि भागीदारी देखील शक्य आहे.

मकर (Capricorn) : धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. घरातील वातावरण मंगलमय राहील. भावंडांची चिंता लागून राहील. निरूत्साही भावना काढून टाका. शांत व संयमी विचार करावा. आज प्रेमप्रकरणी चुका होणार नाही याची दक्षता घ्या. घरातील मंडळींचे आदेश पाळा. ताण-तणाव कमी करण्यासाठी स्वत:ला वेळ द्या. आळस झटकून टाकावा. मुलांच्या आनंदात सहभागी व्हाल. कुटुंबातील तरुण मंडळी तुमच्या मदतीसाठी पुढे येतील. नात्यात समतोल राखण्याची गरज आहे. व्यवसाय विस्ताराची योजना यशस्वी होऊ शकते.

कुंभ (Aquarious) : उगाचच निषेध नोंदवायला जाऊ नका. बौद्धिक चर्चेत सहभाग घ्याल. स्वत:चे मत ठसवून सांगा. अती चिकित्सा करू नका. वेळेचे योग्य नियोजन करा. तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. प्रिय व्यक्तीकडून आनंदाची बातमी कळेल.घरातील मंडळींशी आदराने वागा. तुम्ही सर्व प्रकारच्या भौतिक सुखांचा आनंद घ्याल आणि नवीन प्राप्ती देखील होऊ शकते. तुमच्या नातेवाईकांसोबत तुमचे संबंध तणावपूर्ण असू शकतात आणि तुमचा तुमच्या कुटुंबातील सदस्यांशी वाद होऊ शकतो.

मीन (Pisces) : अडचणीतून मार्ग काढणे क्रमप्राप्त आहे. कौटुंबिक खर्च वाढू शकतात. घरातील ज्येष्ठांच्या तब्येतीकडे लक्ष द्या. मदतीचा हात पुढे कराल. जोडीदाराची प्राप्ती वाढेल. आज तुम्हाला डोक शांत ठेवून विचारपूर्वक कृती करणे आवश्यक आहे. आर्थिक व्यवसायात पैशांचे व्यवहार जपून करा. घरातील वयोवृद्धांचा मान राखा. थोडा अश्यकतपणा वाटेल पण आराम केल्यास उत्साहित वाटेल. भागीदारी व्यवसायात कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेऊ नका. महिला आज घरातील कामात जास्त व्यस्त राहतील. कुटुंबियांकडून शुभवार्ता मिळतील.

Advertisement