SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आशिया चषकासाठी भारतीय संघ जाहीर, दिग्गज खेळाडूंना दिला डच्चू..!!

भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी आहे.. येत्या 27 ऑगस्टपासून सुरु होत असलेल्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेसाठी सोमवारी (ता. 8) भारतीय संघाची घोषणा करण्यात आली.. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ या स्पर्धेत उतरणार आहे.. के.एल. राहुल याच्यावर संघाच्या उपकर्णधार पदाची जबाबदारी देण्यात आलीय..

आशिया खंडातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा म्हणजे आशिया कप… काही दिवसांपूर्वीच यंदाच्या आशिया कप स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झालं होतं. त्यानंतर आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, अर्थात ‘बीसीसीआय’ने (BCCI) या स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर केला…

Advertisement

भारताचा अनुभवी गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे या स्पर्धेला मुकणार आहे. माजी कॅप्टन विराट कोहलीचे संघात पुनरागमन झाले असले, तरी अनेक वरिष्ठ खेळाडूंना या स्पर्धेसाठी डच्चू देण्यात आलाय.. बुमराहच्या गैरहजेरीत मोहम्मद शमीसारखा अनुभवी गोलंदाजही संघात नाही.. त्यामुळे सगळी जबाबदारी आता भुवनेश्वर कुमारच असेल..

Advertisement

गेल्या काही दिवसांपासून सलामीवीर शिखर धवन चांगल्या फाॅर्ममध्ये असतानाही, त्यालाही संघात स्थान मिळालेलं नाही. शिवाय ईशान किशन, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर या युवांनाही संधी मिळालेली नाही. दीपक हुडाला मात्र संघात स्थान मिळालं आहे..

भारतीय संघ – रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जाडेजा, रवीचंद्रन आश्विन, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, आवेश खान.

Advertisement

आशिया स्पर्धेचे वेळापत्रक

सामना दिवस दिनांक संघ ग्रुप  ठिकाण 
1 शनिवार 27 ऑगस्ट अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका बी दुबई
2 रविवार 28 ऑगस्ट भारत विरुद्ध पाकिस्तान दुबई
3 मंगळवार 30 ऑगस्ट बांग्लादेश विरुद्ध अफगाणिस्तान बी शारजाह
4 बुधवार 31 ऑगस्ट भारत विरुद्ध पात्र संघ दुबई
5 गुरुवार 1 सप्टेंबर श्रीलंका विरुद्ध बांग्लादेश बी दुबई
6 शुक्रवार 2 सप्टेंबर पाकिस्तान विरुद्ध पात्र संघ शारजाह
7 शनिवार 3 सप्टेंबर ग्रुप बी पात्र 1 विरुद्ध ग्रुप बी पात्र 2 सुपर 4 शारजाह
8 रविवार 4 सप्टेंबर ग्रुप ए पात्र 1 विरुद्ध ग्रुप ए पात्र 2 सुपर 4 दुबई
9 मंगळवार 6 सप्टेंबर ग्रुप ए पात्र 1 विरुद्ध ग्रुप बी पात्र 1 सुपर 4 दुबई
10 बुधवार 7 सप्टेंबर ग्रुप ए पात्र 2 विरुद्ध ग्रुप बी पात्र 2 सुपर 4 दुबई
11 गुरुवार 8 सप्टेंबर ग्रुप ए पात्र 1 विरुद्ध ग्रुप बी पात्र 2 सुपर 4 दुबई
12 शुक्रवार 9 सप्टेंबर ग्रुप बी पात्र 1 विरुद्ध ग्रुप ए पात्र 2 सुपर 4 दुबई
13 रविवार 11 सप्टेंबर सुपर 4 पात्र 1 विरुद्ध सुपर 4 पात्र 2 सुपर 4 दुबई

 

Advertisement

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement