SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘जिओ’चा जबरदस्त प्लॅन, फक्त 91 रुपयांत मिळतात साऱ्या सेवा…!!

सध्या टेलिकाॅम क्षेत्रातील कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात स्पर्धा वाढलीय.. त्यामुळे जास्तीत जास्त ग्राहकांना आपल्याकडे खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये रस्सीखेच सुरु आहे.. त्यासाठी सर्वच कंपन्या ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी, तसेच ग्राहकांना टिकवून ठेवण्यासाठी नवनव्या ऑफर्स आणत आहेत.

टेलिकाॅम क्षेत्रातील या स्पर्धेत आघाडीवर आहे, ‘रिलायन्स जिओ’.. आपल्या युजर्संसाठी ‘जिओ’कडून सातत्याने स्वस्तात मस्त ऑफर दिल्या जातात.. ‘जिओ’चा (Reliance Jio) असाच एक प्लॅन असून, त्याला ग्राहकांची मोठी पसंती मिळत आहे.. या प्लॅनबाबत सविस्तर जाणून घेऊ या…

Advertisement

‘जिओ’च्या प्लॅनबाबत..

‘रिलायन्स जिओ’ (Reliance Jio)ने आपल्या ग्राहकांसाठी 91 रुपयांचा रिचार्ज प्लॅन सादर केला आहे.. ‘जिओ’च्या तुलनेत ‘एअरटेल’चा (Airtel) 99 रुपयांचा, तर ‘व्हाेडाफोन आयडिया’चा (Vodafone-Idea) 98 रुपयांचा प्लॅन आहे.. ‘जिओ’च्या या प्लॅनमध्ये युजर्सना काेणत्या सेवा मिळतात, याबाबत सविस्तर जाणून घेऊ या..

Advertisement
  • ‘जिओ’च्या 91 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना रोज 100 एमबी डेटा मिळतो. शिवाय या प्लॅनसह अतिरिक्त 200 एमबी डेटा दिला जातो..
  • ‘जिओ’च्या प्लॅनची वैधता 28 दिवसांची आहे. या दरम्यान, कंपनी ग्राहकांना एकूण 3 जीबी डेटा ऑफर करते. त्यात अनलिमिटेड कॉलिंगचीही सुविधा दिली जाते.
  • शिवाय ग्राहकांना जिओ अॅप्सचं सबस्क्रिप्शनही दिलं जातं. सध्या हा प्लॅन केवळ ‘जिओ फोन’साठी आहे.

दरम्यान, व्हाेडाफोन आयडीयाचा 98 रुपयांचा प्लॅन असून, त्यात 200 एमबी डेटा मिळतो. मात्र, ‘एसएमएस’ सुविधा मिळत नाही.. एअरटेलच्या 99 रुपयांच्या प्लॅनची वैधताही 28 दिवस असून, त्यात ग्राहकांना 99 रुपयांचा ‘टॉकटाईम’ मिळतो. काॅलसाठी 2.5 पैसे प्रति सेकंद दराने शुल्क आकारले जाते. शिवाय, मेसेजसाठी शुल्क आकारले जाते.

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement