SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

पैसा कमावण्याची संधी..!! तब्बल ‘इतक्या’ कंपन्यांचे ‘आयपीओ’ येणार..

शेअर बाजारात (Share Market) गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे.. लवकरच गुंतवणुकदारांना कमाईची संधी मिळणार आहे.. अर्थात, त्यासाठी काही दिवसांची वाट पाहावी लागेल.. मात्र, ही संधी साधण्यासाठी तुम्हाला पैसा तयार करायला पुरेसा वेळही मिळणार आहे.

‘आयपीओ’साठी 28 कंपन्यांना मान्यता

Advertisement

‘सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया’ अर्थात ‘सेबी’ने 2022-23 या आर्थिक वर्षात तब्बल 28 कंपन्यांना ‘आयपीओ’ (IPO) आणण्यासाठी परवानगी दिली आहे.. या ‘आयपीओ’च्या माध्यमातून या कंपन्या सुमारे 45 हजार कोटी रुपये उभारणार असल्याची माहिती मिळाली..

‘सेबी’ची (SEBI) ‘आयपीओ’साठी मान्यता मिळालेल्या या कंपन्यांमध्ये ‘फॅब इंडिया’ (Fabindia), ‘एफआयएच मोबाईल्स’ (FIH Mobiles), फाॅक्स काॅन टेक्नोलाॅजी ग्रुपची उपकंपनी- भारत एफआयएच, टीव्हीस सप्लाय चेन सोल्युशन्स, ब्लॅकस्टोन समर्थित आधार हाउसिंग फायनान्स व मॅकलिड्स (McLeods) ‘फार्मास्युटिकल्स अँड किड्स क्लिनिक इंडिया’ आदींचा समावेश आहे.

Advertisement

सध्या शेअर मार्केटमधली परिस्थिती आव्हानात्मक आहे.. त्यामुळे ‘सेबी’कडून ‘आयपीओ’साठी कंपन्यांना मान्यता मिळाली असली, तरी आपले ‘आयपीओ’ लॉन्च करण्यासाठी या कंपन्या योग्य वेळेची वाट पाहत असल्याचे समजते.. कोणत्याही कंपनीने ‘आयपीओ’ची तारीख जाहीर केली नसल्याचे मर्चंट बँकर्सकडून सांगण्यात आले..

चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत 11 कंपन्यांनी ‘आयपीओ’द्वारे 33,254 कोटी रुपये उभे केले आहेत. अर्थात, त्यातील मोठा भाग म्हणजेच 20,557 कोटी रुपये ‘एलआयसी’ (LIC IPO) आयपीओचा होता. ‘सेबी’च्या आकडेवारीनुसार, एप्रिल-जुलै 2022-23 या काळात तब्बल 28 कंपन्यांना ‘आयपीओ’साठी मान्यता देण्यात आली आहे..

Advertisement

‘टाटा टेक’चा ‘आयपीओ’ येणार

दरम्यान, टाटा मोटर्सची उपकंपनी ‘टाटा टेक’चा (TATA tech) ‘आयपीओ’ही या आर्थिक वर्षात बाजारात येण्याची शक्यता आहे.. त्यासाठीची प्रक्रिया सुरु झाली आहे. कंपनीच्या नियोजनाप्रमाणे घडामोडी घडल्यास, सुचीबद्ध यादीसह, 2004 नंतर ‘आयपीओ’ आणणारी ‘टाटा टेक’ ही पहिली समूह कंपनी ठरणार असल्याचे सांगण्यात आले.

Advertisement

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement