SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

सोन्याच्या किंमती वाढणार की घसरणार..? ‘हे’ घटक ठरतील महत्वाचे..!!

सध्याच्या काळात सर्वात सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जाते.. भारतात सणासुदीला दागिने खरेदी करण्याची परंपरा आहे.. तसेच अनेक जण गुंतवणूक म्हणून सोने खरेदी करीत असतात. सध्या जागतिक स्तरावरील घडामोडी पाहता, भविष्यात सोन्याचा दर कसा राहिल, असा प्रश्न अनेकांना पडला आहे..

गेल्या आठवड्याचाच विचार केल्यास, या दिवसांत सोन्याच्या दरात चांगली वाढ झाल्याचे दिसते.. देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या किंमती वाढल्या. ‘एमसीएक्स’ (MCX) वर सोन्याचा फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट 51,864 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची स्पॉट किंमत या महिन्यात प्रति औंस 1,800 डॉलरवर पोहोचलीय..

Advertisement

जाणकारांच्या मते, पुढील आठवड्यात सोन्याच्या किंमती ठरवण्यासाठी 5 घटक महत्वाचे ठरणार असल्याचे सांगितले जाते.. याबाबत सविस्तर जाणून घेऊ या..

हे फॅक्टर्स ठरणार महत्वाचे…

Advertisement

चीन-तैवान-अमेरिका तणाव

गेल्या काही दिवसांपासून रशिया-युक्रेनमध्ये युद्ध आहे.. त्याचा जागतिक बाजारावर चांगलाच परिणाम पाहायला मिळाल.. त्यानंतर आता तैवानच्या मुद्द्यावरून चीन व अमेरिकेतील तणाव वाढला आहे.. त्याचा परिणाम भविष्यात सोन्याच्या किमतीवर होऊ शकतो.. सोन्याच्या दरात वाढ होऊ शकते..

Advertisement

यूएस सीपीआय डेटा

एका अहवालानुसार, यूएस कोर सीपीआय डेटा येत्या काही दिवसांत सोन्याच्या किमती ठरवण्यास मदत करतील. अमेरिकेतील वार्षिक महागाईचा दर जूनमध्ये 9.1 टक्क्यांवर पोहोचलाय. चलनवाढीचा दर खाली आल्यास ‘यूएस फेड’ने चलनविषयक धोरण नरम करणे अपेक्षित आहे.. मात्र, सध्या तरी ‘यूएस फेड’चे चलनविषयक धोरण नरम करण्याबाबत चिन्ह दिसत नाही.

Advertisement

डॉलर इंडेक्स

सोन्याच्या किमतीवर ‘डॉलर इंडेक्स’च्या हालचालीचा परिणाम होईल. ‘डॉलर इंडेक्स’ने 105 ची पातळी तोडली, तर सोन्याच्या किमतीत उसळी येईल. भारतात रुपयाच्या किमतीचा सोन्याच्या देशांतर्गत किमतींवरही परिणाम होईल, असे सांगण्यात आले..

Advertisement

सोन्याचे आजचे दर

सोन्याच्या दरात आज काहीही बदल झालेला नाही.. मात्र, चांदीच्या किंमती किंचीत कमी झाल्या आहेत. आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 47,550 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे, तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 51,870 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

Advertisement

‘गुड रिटर्न्स’ वेबसाइटनुसार चांदीच्या दरा 20 पैशांची कपात झालीय.. चांदीचा आजचा दर 57,400 रुपये प्रति किलो होता. उत्पादन शुल्क, राज्य कर व जडणघडणीसाठी आकारल्या जाणाऱ्या शुल्कामुळे सोन्याच्या किंमती भारतभर बदलतात.

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement