SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

पावसाबाबत पंजाबराव डख यांचा अंदाज, ‘येथे’ होणार मुसळधार पाऊस..

राज्यात गेल्या 4 दिवसांपासून माॅन्सूनच्या पावसाने हजेरी लावल्याने नद्यांची पाणीपातळी वाढली आहे. नदी-नाले ओसंडून वाहत आहेत.. या पावसाने कुठे दिलासा मिळाला, तर कुठे नुकसान केल्याचेही समोर येत आहे.. या पार्श्वभूमीवर पुढील काही दिवसांत पावसाची स्थिती कशी असेल, याबाबत हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी महत्वाची माहिती दिली आहे..

पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आजपासून (ता. 7) पावसाचा जोर वाढणार आहे. राज्यात 7 ते 9 ऑगस्ट दरम्यान सर्वत्र पावसाच्या सरी कोसळणार असल्याचे डख यांनी सांगितले..

Advertisement

उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव व नाशिक जिल्ह्यात आज (ता. 7) व उद्या (ता. 8) अतिवृष्टी होण्याची चिन्हे आहेत. राजधानी मुंबईसह पुणे, नाशिक व मध्य महाराष्ट्रातही 9 ऑगस्टपर्यंत जोरदार पावसाची शक्यता आहे.. पूर्व व पश्चिम विदर्भ, मराठवाड्यातही 9 तारखेपर्यंत जोरदार पावसाचा अंदाज डख यांनी वर्तवला आहे.

भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, दक्षिण कोकण व लगतच्या घाटमाथ्यावर आज (ता. 7) जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकतो.. कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मुंबई आणि पुण्यात जोरदार पावसाची शक्यता आहे.

Advertisement

राजस्थानच्या बिकानेरपासून पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत माॅन्सूनचा (Monsoon update) कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे. आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे.

झारखंड, कर्नाटकच्या काही भागात, तसेच राजस्थानमध्ये चक्राकार वाऱ्यांची स्थिती असल्याची माहिती हवामान विभागाने दिली. दक्षिण भारतात पूर्व-पश्चिम वाहणाऱ्या परस्पर विरोधी वाऱ्यांची स्थिती कायम असल्याने पावसाचा वेग वाढण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले..

Advertisement

पावसाबाबतचा अंदाज

ऑरेंज अलर्ट : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर.

Advertisement

येलो अलर्ट : पालघर, ठाणे, नाशिक, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली.

विजांसह पावसाची शक्यता (येलो अलर्ट) : बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, अमरावती, वर्धा, चंद्रपूर.

Advertisement

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement