SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘या’ मुलींनाही मिळणार कन्यादान योजनेचा लाभ, एसटी महामंडळाचा मोठा निर्णय..!!

एसटी महामंडळाने 2016 मध्ये आपल्या कर्मचाऱ्यांच्या मुलींसाठी ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजना’ सुरु केली होती. त्यानुसार, 1 एप्रिल 2016 नंतर जन्मलेल्या मुलीच्या नावे 17,500 रुपये दामदुप्पट योजनेत ठेवले जातील. या योजनेतून कर्मचाऱ्यांच्या मुलीला तिच्या 21व्या वर्षी एकरकमी एक लाख रुपये दिले जातात..

दरम्यान, कन्यादान योजनेतून एसटीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी दत्तक घेतलेल्या मुलीला एक लाख रुपयांचे आर्थिक साहाय्य देण्याबाबत कोणत्याही सूचना नव्हत्या. याबाबत कर्मचाऱ्यांनी एसटी महामंडळाकडे तक्रारी केल्या होत्या.. त्याची दखल घेत एसटी महामंडळाने आता दत्तक मुलींचाही कन्यादान योजनेत समावेश केला आहे.

Advertisement

‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजने’त कर्मचारी, अधिकाऱ्यांनी दत्तक घेतलेल्या मुलीचाही समावेश करण्यात आला आहे.. त्यामुळे या मुलीच्या 21व्या वर्षी तिलाही आता कन्यादान योजनेतून एक लाख रुपये मिळणार आहेत.. त्यामुळे एसटी महामंडळाच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे..

अशी आहे तरतूद…

Advertisement

एसटी कर्मचाऱ्याने एखाद्या अनाथ मुलीस दत्तक घेतल्यास, त्या मुलीला कर्मचाऱ्याची प्रथम मुलगी मानून योजनेचा (kanyadan yojana) लाभ दिला जाईल.. मात्र, त्यासाठी दत्तक घेतलेल्या मुलीचे वय 0 ते 6 वर्षांदरम्यान असावे. दत्तक मुलीच्या वयाच्या 6 वर्षांपर्यंत तिचा अर्ज स्वीकारला जाईल.. वाढीव जास्तीत जास्त 2 महिन्यांपर्यंत आणखी मुदत मिळेल..

दत्तक मुलीव्यतिरिक्त एसटी कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या इतर जन्मलेल्या मुलींसाठी त्यांच्या जन्माच्या एका वर्षांच्या विहीत मुदतीतच अर्ज स्वीकारले जातील. वाढीव जास्तीत जास्त 2 महिन्यांपर्यंत मुदत दिली जाते..

Advertisement

योजनेचा लाभ कोणाला मिळणार..?

कायदेशीर प्रक्रिया पार पाडून दत्तक घेतले असेल, तर नवीन केलेल्या तरतुदीनुसार एकल पालक, अपत्य नसणारे पालक, परित्यक्ता महिला, घटस्फोटीत महिला / पुरुष, विधवा / विधूर यांनाही ही योजना लागू असेल. या योजनेची अंमलबजावणी 1 सप्टेंबर 2020 पासून सुरू करण्यात आली आहे..

Advertisement

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement