SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आठवा वेतन आयोग कधी लागू होणार..? मोदी सरकारने दिली महत्वाची माहिती..

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. केंद्र सरकारकडून सातवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात भरघोस वाढ झाली आहे.. महागाई भत्त्यात (DA) मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने सरकारी कर्मचाऱ्यांच्या खिशात पैसा खुळखुळू लागला आहे…

सातव्या वेतन आयोगाचे लाभ मिळत असतानाच, सरकारी कर्मचाऱ्यांना आता आठव्या वेतन आयोगाचे (8th pay commission) वेध लागले आहेत. आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, असा प्रश्न संसदेच्या अधिवेशनातही उपस्थित झाला असता, त्यावर केंद्रीय राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी उत्तर देताना सरकारी कर्मचाऱ्यांचा संभ्रम दूर केला..

Advertisement

आठव्या वेतन आयोगाचा विचार नाही…

ते म्हणाले, की “सरकारी पातळीवर सध्या तरी कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागू करण्याबाबत अद्याप कोणताही विचार सुरू नाही.. सध्या तरी आठवा वेतन आयोग आणण्याचा कोणताही विचार केला जात नाही.. असं कोणतंही नियोजन नाही..”

Advertisement

केंद्रीय कर्मचारी व पेन्शनधारकांचे वेतन, भत्ते व पेन्शनमध्ये सुधारणा करण्यासाठी आठव्या वेतन आयोगाचा विचार केला जात नाही. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार, केंद्रीय कर्मचारी व निवृत्ती वेतनधारकांना दिलं जाणारं वेतन, भत्ते व निवृत्तीवेतनचा आढावा घेण्यासाठी दुसरा वेतन आयोग स्थापन करण्याची गरज नसल्याची माहितीही त्यांनी दिली..

कर्मचाऱ्यांसाठी आठवा वेतन आयोग आणण्याची शक्यताही चौधरी यांनी नाकारली नाही.. ते म्हणाले, की “आता कर्मचाऱ्यांच्या कामगिरीच्या आधारे पगारवाढ देण्यासाठी सरकारकडून नवीन प्रणालीवर काम केलं जात आहे..  ‘पे मॅट्रिक्स’चे पुनरावलोकन व पुनरावृत्तीसाठी अशी व्यवस्था केली जात आहे.. सरकार नवीन वेतन मेट्रिक्स लागू करू शकतं..”

Advertisement

केंद्र सरकार आता नव्या दिशेनं काम करतंय.. त्यात 50 टक्क्यांपेक्षा जास्त ‘डीए’ असल्यास पगारात स्वयंचलित सुधारणा होईल. त्यासाठी ‘ऑटोमॅटिक पे रिव्हिजन सिस्टिम’ सरकार आणणार आहे.. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा लाभ मिळण्याची अपेक्षा असल्याचे सांगण्यात येते..

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement