SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

प्रो कबड्डीचा नवा हंगाम लवकरच, लिलावात ‘या’ खेळाडूवर लागली करोडो रुपयांची बोली..

प्रो कबड्डीचा नववा हंगाम (Pro Kabaddi -9) काही दिवसांतच सुरू होणार असून तत्पूर्वी काल (ता. 5 ऑगस्ट) दिग्गज खेळाडू खरेदी करण्यासाठी लिलाव प्रक्रिया पार पडली. लिलाव प्रक्रियेच्या काल पहिल्या दिवसामध्येअष्टपैलू पवन शेरावत याच्यावर विक्रमी बोली लावण्यात आली. खरेदीसाठी यू-मुंबाशी चढाओढ होऊन अखेर त्याला 2 कोटी 26 लाख रूपयांना तमिळ थलायव्हाज या संघाने खरेदी करून पवन शेरावतने विक्रमी बोलीचाही रेकॉर्ड केला.

लिलावात अ-गटाच्या तीन खेळाडूंनी एक कोटी रुपयांचा आकडा पार केला. कालच्या लिलाव प्रक्रियेत पवन शेरावतशिवाय विकास खंडोलाला आपल्या संघात घेण्यासाठी बंगळूरु बुल्सने 1 कोटी 70 लाख रुपये तर पुणेरी पलटनने इराणचा डावा कोपरारक्षक फझल अत्राचलीवर 1 कोटी 38 लाख रूपयांची बोली लावून आपल्या संघात घेतले.

Advertisement

अष्टपैलू मोहम्मद ईस्माइल नबीबक्षसाठी 87 लाखांची बोली लावली. यू मुंबाने ब-गटातील गुमान सिंगवर 1 कोटी 22 लाख रुपयांची बोली लावण्यात आली. प्रदीप नरवाल आणि सुनील कुमार यांना प्रत्येकी 90 लाख रुपयांना अनुक्रमे यूपी योद्धाज आणि जयपूर पिंक पँथर्स यांनी संघात घेतलं. अद्याप संदीप नरवालला कोणत्याही संघाने खरेदी केलेले नाही.

प्रो कबड्डीच्या आठव्या हंगामात व त्यापूर्वी प्रेक्षकांची मनं जिंकणारा आणि तगडी फॅन फॉलोविंग असणाऱ्या प्रदीपसाठी आठव्या हंगामात 1 कोटी 65 लाखांची विक्रमी बोली लागली होती. आता तो विक्रम पवन व विकास यांनी मोडीत काढला असल्याचं दिसत आहे. यामुळे ज्या खेळाडूंना करोडो रुपयांची बोली लागत आहे त्यांचा खेळ पाहणे उत्सुकतेचे ठरणार असून कामगिरी मध्ये सातत्य लावलेल्या बोलीमुळे असेच राहील का, हे बघणं महत्वाचं ठरेल.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 http://play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement