SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘नोकिया’चा सर्वात स्वस्त फोन लाॅंच, तब्बल एक महिना ‘बॅटरी बॅकअप’…!!

‘नोकिया’ म्हटलं, की दमदार ‘बॅटरी बॅकअप’ मिळण्याची खात्रीच असे.. आपले हे वैशिष्ट्य आजही या ब्रॅंडने जपले आहे.. अनेक कंपन्यांचे दमदार स्मार्टफोन बाजारात आले असले, तरी ‘नोकिया’सारखी बॅटरी बॅकअप देणं, या कंपन्यांनाही शक्य झाले नाही.

आपली हीच ओळख कायम ठेवताना, ‘नोकिया’चा दमदार फोन पुन्हा एकदा भारतीय बाजारात दाखल झालाय.. ‘नोकिया 8120 4G’ असं या फोनचे नाव आहे.. अवघ्या 3999 रुपयांमध्ये हा फोन ‘नोकिया’ (Nokia) व ‘अमेझाॅन’ (Amezon India) वेबसाईटवरुन खरेदी करता येणार आहे.. या फोनच्या फीचर्सबाबत सविस्तर जाणून घेऊ या…

Advertisement

‘नोकिया 8120 4G’ची वैशिष्ट्ये

  • नोकियाच्या या फोनमध्ये 3.8 इंच QVGA डिस्प्ले मिळेल. हा फोन UniSoc T107 प्रोसेसरवर काम करील.
  • फोनमध्ये 128 एमबी स्टोअरेज, 48 एमबी रॅम मिळते. 32 जीबीपर्यंत ‘एक्सपांडेबल मेमरी’ करता येईल..
  • हा फोन ड्युअल सिम सपोर्टसह येतो.. ऑपरेटिंग सिस्टमबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन 30+OS वर चालतो.
  • फोटोग्राफीमध्ये 0.3 मेगापिक्सल VGA रिझोल्युशन कॅमेरा आहे.
  • एफएम रेडिओ व म्युझिक प्लेयरही मिळेल.. एफएम रेडिओ वायर व वायरलेस मोडमध्येही काम करतो. फोनमध्ये 3.5 मिमी ऑडिओ जॅकसह मायक्रो यूएसबी पोर्ट आहे.
  • कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ व्हर्जन-5 उपलब्ध आहे.
  • हा फोन मायक्रो-USB पोर्टसह येतो. अतिरिक्त फिचर म्हणून यात टॉर्च लाईटही आहे. यात पॉवर, न्यूमेरिक आणि ‘फंक्शन की’ देखील आहेत.

27 दिवस ‘बॅटरी बॅकअप’

Advertisement

‘नोकिया’च्या या फोनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, बॅटरी.. या फोनमध्ये 1450 mAh बॅटरी असून, एका चार्जवर 27 दिवसांपर्यंत स्टँडबाय वेळ देते. 4G नेटवर्कवर 6 तासांपर्यंतचा टॉकटाइम दिला जात असल्याचा दावाही केला आहे. या फोनचं वजन फक्त 107 ग्रॅम असल्याचे समजते.. लाल व गडद निळा रंगांत हा फोन येतो..

188 रुपयांत करा खरेदी

Advertisement

अमेझाॅनवर हा फोन फक्त 188 रुपयांत खरेदी करता येणार आहे. हा फोन ‘ईएमआयवर खरेदीचा पर्याय दिला आहे. त्यात ठराविक बॅंकांचे क्रेडिट कार्डचा वापर केल्यास, 24 महिन्यांच्या ‘ईएमआय’वर तुम्हाला दर महिन्याला फक्त 188 रुपये मोजावे लागणार आहेत. मात्र, त्यावर 519 रुपये व्याज आकारले जाईल. शिवाय कंपनी फोनवर एक वर्षाची रिप्लेसमेंट गॅरंटी देतेय.

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement