SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

भारताच्या उपराष्ट्रपतीपदी जगदीप धनखड, विराेधकांची किती मते फुटली..?

देशाच्या राजकारणातून मोठी बातमी आहे.. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत ‘एनडीए’चे उमेदवार जगदीप धनखड यांनी विजय मिळवला.. ‘यूपीए’च्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांचा धनखड यांनी पराभव केला. भारताचे उपराष्ट्रपती म्हणून येत्या 11 ऑगस्ट रोजी ते शपथ घेतील..

खरं तर लोकसभा व राज्यसभेत भाजपच्या सर्वाधिक जागा आहेत.. शिवाय, जनता दल (युनायटेड), वायएसआरसीपी, बसपा, ‘एआयएडीएमके’ यांसारख्या प्रादेशिक पक्षांनीही धनखड यांना पाठिंबा जाहीर केला होता. त्यामुळे त्यांचा विजय पक्का मानला जात होता.

Advertisement

‘युपीए’च्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांना आम आदमी पार्टी (आप), झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) व तेलंगणा राष्ट्र समितीने (टीआरएस) पाठिंबा जाहीर केला होता. शिवाय, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही अल्वा यांना पाठिंबा दिला होता..

देशाच्या उपराष्ट्रपती पदासाठी (Vice President election) शनिवारी (ता. 6) निवडणूक झाली.. त्यानंतर लगेच मतमोजणी झाली. या निवडणुकीत 780 पैकी 725 खासदारांनी मतदान केलं. त्यात धनखड यांना 528, तर अल्वा यांना 182 मते मिळाली, तर 15 मते अवैध ठरली.

Advertisement

तृणमूल काँग्रेसची तटस्थ भूमिका

तृणमूल काँग्रेसच्या एकूण 36 खासदारांनी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला होता. शिवसेनेने अल्वा यांना पाठिंबा दर्शवला असला, तरी प्रत्यक्ष निवडणुकीत शिवसेनेच्या 6 खासदारांनी मतदान केलं नाही. तसेच भाजपच्या 2, समाजवादी पार्टीचे 2 व बसपाच्या एका खासदारानं मतदान केलं नाही. तृणमूल काँग्रेसच्या दोन खासदारांनी पक्षादेश डावलून मतदान केलं.

Advertisement

विद्यमान उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ 10 ऑगस्ट रोजी संपणार आहे. त्यानंतर जगदीप धनखड यांच्याकडे उपराष्ट्रपती पदाचा कार्यभार येईल.. सध्या ते पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून काम पाहत होते. राजस्थानशी त्यांचे घट्ट नाते राहिले आहे.. त्यांचे जन्मस्थान झुंझुनू, तर कर्मस्थळ जयपूर उच्च न्यायालय होते. राजस्थान हायकोर्ट बार असोसिएशनचे ते अध्यक्ष राहिले आहेत. ते 11 वर्षे काँग्रेसमध्ये होते. त्यानंतर 2003 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement