SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

रेशन कार्डबाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय, आता ‘या’ लोकांनाही मिळणार लाभ…!

रेशनकार्ड अर्थात शिधापत्रिका.. सार्वजनिक वितरण योजनेमार्फत दिला जाणारा महत्वाचा दस्ताऐवज. कोणतेही सरकारी काम असो, रेशनकार्डची मागणी केली जातेच. गोरगरीब जनतेला स्वस्त धान्य दुकानातून जीवनाश्यक वस्तू स्वस्त दरात मिळावी, यासाठी कुटुंबाचं रेशनकार्ड असणं महत्वाचं असतं..

असं असलं, तरी समाजातील एक मोठा घटक आजही रेशनकार्डपासून, त्यापासून मिळणाऱ्या सवलतीपासून दूरच असल्याचे दिसून येतं.. अशा लोकांनाही रेशनचा लाभ मिळावा, यासाठी मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे..

Advertisement

‘माय रेशन – माय राईट’

मोदी सरकारने ‘माय रेशन – माय राईट’ (My Ration – My right) ही मोहीम सुरु केलीय. त्यानुसार, देशातील 11 राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये रेशन कार्ड जारी करण्यासाठी ‘सामायिक नोंदणी’ सुविधा सुरू केली आहे… बेघर लोक, निराधार, स्थलांतरित व इतर पात्र लाभार्थ्यांना शिधापत्रिका (Ration Card) मिळावी, त्यासाठी त्यांना अर्ज करता यावा, यासाठी ही नोंदणी सुविधा सुरु करण्यात आली आहे..

Advertisement

याबाबत केंद्रीय अन्न सचिव सुधांशू पांडे यांनी माहिती दिली.. ते म्हणाले, की “सामान्य नोंदणी सुविधा अर्थात ‘माय रेशन – माय राईट’ हा उपक्रम सुरु केला आहे.. राज्य व केंद्रशासित प्रदेशांतील वंचित घटकांना रेशन कार्ड जारी करण्यास मदत करण्यासाठी ही सुविधा सुरु केली आहे.. जेणेकरून हा घटकही ‘एनएफएसए’ अंतर्गत पात्रतेचा लाभ घेऊ शकतील…”

गेल्या 7-8 वर्षांत विविध कारणांमुळे सुमारे 18 ते 19 कोटी लाभार्थ्यांच्या सुमारे 4.7 कोटी शिधापत्रिका रद्द केल्या आहेत. पात्र लाभार्थ्यांना राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांद्वारे नियमितपणे नवीन कार्डदेखील जारी केले जात असल्याचे ते म्हणाले..

Advertisement

नवीन वेब-आधारित सुविधा प्रायोगिक तत्त्वावर 11 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये उपलब्ध असेल. त्यानंतर या महिनाअखेरीस सर्व 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात ही सुविधा सुरु केली जाणार आहे.. सध्या आसाम, गोवा, लक्षद्वीप, महाराष्ट्र, मेघालय, मणिपूर, मिझोराम, नागालँड, त्रिपुरा, पंजाब व उत्तराखंडमध्ये ही सुविधा मिळणार आहे..

राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत, सध्या सुमारे 79.77 कोटी लोकांना (67 टक्के) अत्यंत सवलतीच्या दरात अन्नधान्य पुरवले जाते.. या मोहिमेनंतर त्यात आता आणखी 1.58 कोटी लाभार्थी जोडले जाण्याची शक्यता असल्याचे पांडे यांनी सांगितले..

Advertisement

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement