SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

दर महिन्याला फिरवा नवी गाडी, ऑटो कंपन्यांची भन्नाट ऑफर…!!

नवनव्या गाड्यांची आवड असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.. आता तुम्हाला दर महिन्याला नवी गाडी फिरवता येणार आहे.. त्यासाठी भारतातील मोठमोठ्या ऑटो माेबाईल कंपन्यांनी खास प्लॅनच सादर केला आहे.. त्यानुसार, तुम्हाला 1 ते 48 महिन्यांपर्यंत थेट कंपनीकडूनच कार भाड्याने मिळणार आहे..

आता तुम्हाला कोणतीही कार खरेदी करण्याची गरज नाही.. त्याऐवजी थेट कंपनीचा ‘सबस्क्रिप्शन प्लॅन’ घेऊन दर महिन्याला तुम्ही तुमची आवडती गाडी भाड्याने घेऊन फिरण्याची हौस भागवू शकता.. आपली आवडती कार पाहिजे तितके दिवस वापरता येणार असल्याचंही सांगण्यात आलं..

Advertisement

नोकरीनिमित्त एक-दोन वर्षांसाठी स्थलांतरित होणाऱ्या नोकरदारांसाठी ही योजना उत्तम आहे. कार सब्सक्रिशन घेण्यासाठी डाउन पेमेंट किंवा ईएमआय (EMI) भरावा लागणार नाही. त्याऐवजी दर महिन्याला ‘सबस्क्रिप्शन’चे पैसे द्यावे लागतील. या योजनेत तुम्ही 6 महिन्यांत 6 वेगवेगळ्या कार भाड्याने घेऊ शकता.

कंपनीचा ‘सबस्क्रिप्शन प्लॅन’ निवडल्यानंतर फक्त भाडे भरावे लागेल.. इतर शुल्क भरावं लागणार नाही.. तुम्हाला ‘सबस्क्रिप्शन प्लॅन’ कधीही वाढवता येईल.. ‘सबस्क्रिप्शन प्लॅन’ संपल्यावर कंपनी स्वत:हून तुमच्याकडून गाडी घेऊन जाईल. नंतर तुम्हाला परत सबस्क्रिप्शन प्लॅन घ्यावा लागेल..

Advertisement

विविध कारचे सबस्क्रिप्शन प्लॅन

हुंदाई सँट्रो (दरमहा रक्कम)
एका महिना- 27,399 रुपये
दोन महिने- 26,799 रुपये
सहा महिने – 21,999 रुपये
एका वर्ष- 21,099 रुपये
दोन वर्ष – 20,099 रुपये
चार वर्ष – 15,850 रुपये (दरमहा)

Advertisement

हुंदाई क्रेटा (Hyundai Creta)
एक महिना – 43,499 रुपये
दोन महिने – 42,999 रुपये
सहा महिने – 36,599 रुपये
एक वर्ष – 35,999 रुपये
दोन वर्ष – 35,099 रुपये (दरमहा)

मारूती सुझुकी व्हिटारा ब्रेझा (Vitara Brezza)
एक महिना – 33,899 रुपये
दोन महिने – 33,299 रुपये
सहा महिने – 28,099 रुपये
एक वर्ष – 27,699 रुपये
दोन वर्ष – 26,699 रुपये

Advertisement

महिंद्रा स्कॉर्पिओ (Mahindra Scorpio)
एक महिना – 41,099 रुपये
दोन महिने – 40,699 रुपये
सहा महिने – 34,799 रुपये
एक वर्ष – 33,899 रुपये
दोन वर्ष – 32,999 रुपये

होंडा अमेझ (Honda Amaze)
एक महिना – 27,599 रुपये
दोन महिने – 26,999 रुपये
सहा महिने – 22,499 रुपये
एक वर्ष – 21,599 रुपये
दोन वर्ष – 20,599 रुपये

Advertisement

समजा, तुम्ही 4 वर्षांसाठी हुन्दाई सँट्रो (Hyundai Santro) कार भाड्याने घेतली, तर तुम्हाला दर महिन्याला 15,850 रुपयांचा हप्ता भरावा लागेल.. दुसरीकडे ही कार खरेदी केल्यास, 4 वर्षांसाठी कमीत कमी 14,193 रुपयांचा ‘ईएमआय’ भरावा लागेल. शिवाय 27,025 रुपयांचं डाऊनपेमेंट करावं लागतं..

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement