SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

ॲमेझॉन, फ्लिपकार्टवर बंपर सेल सुरू, अर्ध्या किंमतीत मिळताय स्मार्ट टीव्ही..

येत्या 15 ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्यदिनानिमित्त Amazon Great Freedom Festival आणि फ्लिपकार्ट Big Saving Days सेल आज शुक्रवारी मध्यरात्री 12 वाजता सुरू झाले आहेत. या सेलमध्ये तुम्ही Amazon India वरून 60 टक्के पर्यंत डिस्काउंट देऊन स्मार्ट टीव्ही खरेदी करू शकता. याशिवाय फ्लिपकार्टवर देखील स्मार्ट टीव्ही विशेष सवलतीत उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

Amazon वरील ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल 6 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट पर्यंत सुरू राहणार आहे. जर तुम्ही या संधीचा लाभ घेऊ इच्छित असाल तर तुम्हाला स्वस्तात स्मार्ट टीव्ही खरेदी करता येणार आहे. तुम्हाला बेस्ट डिस्काऊंट आणि ऑफर्स हवे असतील तर ही एक चांगली वेळ आहे. चला तर मग कोणते टीव्ही स्वस्तात मिळणार जाणून घेऊ..

Advertisement

OnePlus TV 43 Y1S Pro:

▪️ 4K रिझोल्यूशन असणारा वनप्लसचा 43 इंचाचा स्मार्ट टीव्ही Netflix, Prime Video, Zee5, Oxygen Play, Eros Now, JioCinema, SonyLiv, YouTube, Hungama आणि Hotstar सारख्या Apps ना सपोर्ट करतो.
▪️ टीव्हीमध्ये 3 HDMI पोर्ट, स्टिरीओ सराउंड स्पीकर, 60 Hz रिफ्रेश रेट, 2 USB पोर्ट, टीव्हीला ड्युअल-बँड वाय-फाय साउंड व 24W आउटपुट

Advertisement

Redmi Smart TV L43R7-7AIN:

▪️ रेडमीच्या या स्मार्ट टीव्हीमध्ये 43 इंच स्क्रीन व 4K रिझोल्यूशन आणि टीव्हीला Netflix, Prime Video, YouTube, Disney + Hotstar सपोर्टेबल.
▪️ 3 HDMI पोर्ट, स्टिरीओ स्पीकर आणि 60 Hz रिफ्रेश रेट असलेली स्क्रीन. रेडमी कंपनीचा हा स्मार्ट टीव्ही 178 डिग्री वाइड व्ह्यूइंग अँगलसह येतो. यात ड्युअल-बँड वाय-फाय, ब्लूटूथ 5.0, 3HDMI Port, सेट-टॉप बॉक्स, 2USB Port, 30W साउंड आउटपुट, डॉल्बी ऑडिओ, Dollby Atmos, Android 10 पॅचवॉल 4, क्वाड-कोर प्रोसेसर, 2GB रॅम आणि 16 जीबी स्टोरेज मिळते.

Advertisement

LG Smart TV 43LM5650PTA:

▪️ LG स्मार्ट टीव्हीची स्क्रीन साइज 43 इंच आणि रिझोल्यूशन 1080 पिक्सेल. LG TV Netflix, Amazon Prime, Disney + Hotstar आणि YouTube सारख्या Apps सपोर्ट करतो.
▪️ टिव्हीत 2HDMI पोर्ट, स्टिरीओ सराउंड स्पीकर, टीव्ही स्क्रीनचा रिफ्रेश रेट 50Hz आहे. कनेक्टिव्हिटीसाठी 2 HDMI पोर्ट, 1USB पोर्ट उपलब्ध आहेत. या टीव्हीमध्ये 20W साउंड आउटपुट आहे.
▪️ एलजीचा हा टीव्ही वेबओएस स्मार्ट टीव्ही असून त्यामध्ये अनलिमिटेड OTT App सपोर्ट, मिनी टीव्ही ब्राउझर, क्लाउड फोटो, एलजी कंटेंट स्टोअर, होम डॅशबोर्ड आणि व्हिडिओ, मल्टी-टास्किंग, स्क्रीन मिरर, ऑफिस 365, वाय-फाय डिस्प्ले अशी खास फीचर्स आहेत.

Advertisement

Westinghouse Smart TV WH50UD82:

▪️ वेस्टिंगहाउस टीव्ही ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल दरम्यान 60% पर्यंत सूट मिळू शकते. कंपनीचे 24 इंच नॉन-स्मार्ट एलईडी टीव्ही व 4 स्मार्ट अँड्रॉइड टीव्ही – 32 इंच HD रेडी, 40 इंच फुलएचडी, 43 इंच फुलएचडी आणि 55-इंच अल्ट्राएचडी, याशिवाय नव्याने लॉंच झालेल्या 32HD, 43 UHD आणि 50 इंच UHD मॉडेल्सवर या ई- कॉमर्स साइटवरून SBI बँक क्रेडिट कार्डसह 10 टक्के अतिरिक्त सूट मिळू शकते.

Advertisement

▪️ वेस्टिंगहाऊसच्या या स्मार्ट टीव्हींना 60 हर्ट्झ रिफ्रेश रेट स्क्रीन, 178 डिग्री वाइड व्ह्यूइंग अँगल, 3 एचडीएमआय पोर्ट्स, ब्ल्यू रे स्पीकर, 2 यूएसबी पोर्ट यांसारखी फीचर्स मिळतात. प्राइम व्हिडिओ, हॉटस्टार, ZEE5, Sony Liv apps चा सपोर्ट आणि 40 W साउंड आउटपुट मिळेल.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 http://play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement