SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

सोन्याच्या किंमतीत वाढ, चांदी घसरली..! प्रमुख शहरातील बाजारभाव जाणून घ्या..

गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. खरं तर ऑगस्टमध्ये सण-उत्सव साजरे होत असतात. त्यामुळे या दिवसांत सराफ बाजारात मोठी उलाढाल होते.. त्याचा परिणाम सोन्या-चांदीच्या दरावरही झाल्याचे दिसून येते.. (Todays Gold-Silver rate)

भारतीय सराफा बाजारात आज (ता. 5) सोन्याच्या भावात वाढ झाली, तर चांदी स्वस्त झाली. आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 47,500 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर 24 कॅरेट सोन्याच्या किंमत 51,820 रुपये प्रति 10 ग्रॅमवर गेली आहे.. 999 शुद्ध चांदीचा भाव आज 57,838 रुपये प्रति किलो झाला होता.

Advertisement

सोन्या-चांदीच्या दरात रोज बदल होतात. आज 999 शुद्ध सोने 101 रुपयांनी महागले. 995 शुद्ध सोने 100 रुपयांनी, 916 शुद्ध सोने 92 रुपयांनी, 750 शुद्ध सोन्याच्या दरात आज 76 रुपयांनी वाढ झाली. शिवाय 585 शुद्धता असलेले सोने 59 रुपयांनी महाग झाले. दुसरीकडे त्याच वेळी एक किलो चांदी 219 रुपयांनी स्वस्त झाली..

प्रमुख शहरांतील भाव (प्रति तोळा)

Advertisement

मुंबई
– 22 कॅरेट-  47,500 रुपये
– 24 कॅरेट – 51,830 रुपये

पुणे
– 22 कॅरेट- 47,530 रुपये
– 24 कॅरेट- 51,580 रुपये

Advertisement

नागपूर
22 कॅरेट – 47,530 रुपये
24 कॅरेट – 51,580 रुपये

नाशिक
22 कॅरेट- 47,530 रुपये
24 कॅरेट – 51,580 रुपये

Advertisement

‘वन गोल्ड – वन रेट’

दरम्यान, उत्पादन शुल्क, राज्य कर आणि जडणघडणीसाठी आकरले जाणारे शुल्कामुळे (मेकिंग चार्जेसमुळे) सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात. मात्र, आता तसे होणार नाही.. भारतात लवकरच ‘वन गोल्ड-वन रेट’ योजना लागू केली जाणार आहे.. त्यामुळे देशभरात सोन्याचा एकच दर असेल, असे सांगण्यात आले..

Advertisement

सोने तेच, सोन्याची शुद्धताही तीच.. मात्र, आयात केलेले सोने बंदरातून वेगवेगळ्या राज्यांमध्ये पाठवले जाते. वाहतूक खर्च जोडल्यानंतर सोन्याची किंमत बदलू लागते.. मात्र, आयातीच्या वेळी सोन्याची किंमत समान असते. त्यामुळे येत्या काळात देशात ‘वन गोल्ड वन रेट’ धोरण लागू होणार असल्याच्या हालचाली सुरू आहेत..

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement