SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

15 रुपयांत ‘एवढा’ इंटरनेट डेटा, ‘ही’ कंपनी रिचार्ज संपण्याचं टेंशन करणार दूर..

इंटरनेट डेटा आणि मोबाईल वापरणं हे आता अनेकांचं रोजचं रुटीन बनलं आहे. कोणाला सकाळी झोपेतून उठल्यावर तर कोणाला रात्री झोपण्याच्या अगोदर एकदा का होईना पण सतत फ्रीज उघडल्यासारखं मोबाईल पाहावा लागतो. पण चिंता तेव्हा होते जेव्हा 50% Data संपतो किंवा रोजचा इंटरनेट डेटा संपतो. पण आता एक दिग्गज कंपनी तुमचं हे टेन्शन दूर करणार आहे.

Airtel, Vi, Reliance Jio सारख्या टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या डेटा प्लॅन्सचे दर भलतेच वाढवून ठेवले आहेत. तुम्ही यापैकी कोणते सिम वापरताय त्यानुसार तुम्ही डेटा प्लॅन्स वापरत असाल, पण ज्यांच्या मोबाईलमध्ये रिलायन्स जिओचे सिम असेल असे वापरकर्ते आता कमी किंमतीचा विशेष रिचार्ज व्हाउचरचा फायदा घेऊ शकणार आहेत.

Advertisement

जेव्हा तुमचा दैनंदिन (1.5GB, 2GB, 3GB याप्रमाणे) डेटा संपतो. जिओ चे यूजर असाल तर तुम्हाला 50% आणि 90% संपल्यावर तसा अलर्ट मेसेज देखील येतो. मग आता करायचं काय, तर जिओ ने अनेक भन्नाट प्लॅन्स आणले आहेत, तेही कमी किंमतीमध्ये! चला मग जाणून घेऊ सविस्तर..

▪️ जिओचा 15 रुपयांचा डेटा प्लॅन: अवघ्या 15 रुपयांच्या रिचार्ज मध्ये आपण 1 जीबी डेटा मिळवू शकता. तुमच्या सध्याच्या रिचार्ज प्लॅनची जी वैधता असेल तोपर्यंत हा प्लॅन चालू राहील.

Advertisement

▪️ जिओचा 25 रुपयांचा डेटा प्लॅन: या रिचार्ज प्लॅन मध्ये तुम्हाला एकूण 2 जीबी डेटा मिळेल. या प्लॅनची वैधता तुमच्या सध्याच्या चालू रिचार्ज प्लॅनसोबत संपेल.

▪️ जिओचा 61 रुपयांचा डेटा प्लॅन: जिओच्या या 61 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला एकूण 6 जीबी डेटा मिळतो. या प्लॅनची वैधता तुमच्या सध्याच्या रिचार्ज प्लॅन असेपर्यंत राहिल.

Advertisement

▪️ जिओचा 121 रुपयांचा डेटा प्लॅन: दररोज जास्त डेटा लागत असेल तर 121 रुपयांचा रिचार्ज करून तुम्ही 12 जीबी डेटा मिळवू शकता. हा रिचार्ज तुमच्या सध्याच्या प्लॅनच्या वैधतेपर्यंत सुरू राहील.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 http://play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement