SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘बुलेट’ येतेय नव्या अवतारात, डॅशिंग ‘लूक’ नि स्वस्तात मस्त..!!

बुलेटची सवारी, म्हणजे राजेशाही थाट… हृदयाचे ठोके वाढवणारा बुलेटचा धाडधाड आवाज नि दणकट लूक.. त्यामुळे बुलेटचं आकर्षण आजच्या पिढीलाही आहे.. काळ बदलला, पिढी बदलली.. तसे बुलेटमध्येही बदल झाले.. तरुणाईला भुरळ घालण्यासाठी बुलेटही अपडेट होत गेली..

‘रॉयल एनफिल्ड’ (Royal Enfield)… बुलेट बनविणारी कंपनी.. या कंपनीचे नवं माॅडेल लवकरच रस्त्यावर धुमाकूळ घालण्यासाठी येतंय.. ‘राॅयल एनफिल्ड हंटर 350’ असं या माॅडेलचं नाव आहे.. नुकताच या गाडीचा डॅशिंग ‘लूक’ समोर आला. ‘रॉयल एनफिल्ड’ कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर सिद्धार्थ लाल यांनी या बुलेटचा टिझर ‘इन्स्टाग्राम’ अकाऊंटवर शेअर केलाय..

Advertisement

 

View this post on Instagram

 

Advertisement

A post shared by Sid Lal (@sidlal)

Advertisement

‘रॉयल एनफिल्ड’च्या आतापर्यंतच्या सर्व गाड्यांमध्ये ही बाईक (Bike) सर्वात स्वस्त असेल, असा दावा केला जातोय.. येत्या 7 ऑगस्टला ही जबरदस्त बाईक लॉंच होणार असल्याचे टिझरमध्ये म्हटलंय.. ‘रॉयल एनफिल्ड हंटर 350’ (Royal Enfield Bullet 350) ही बाईक ‘रेट्रो’, ‘मेट्रो’ व ‘मेट्रो रिबेल’ अशा नव्या व्हेरिएंट्समध्ये दिसणार असल्याचे सांगितले जाते..

‘हंटर 350’ची वैशिष्ट्ये

Advertisement
  • ‘रॉयल एनफील्ड हंटर 350’मध्ये 14.87kW म्हणजेच 20.2 hp चे पॉवर आउटपुट असेल.
  • ‘व्हील बेस’ 1,370 मिमी आणि लांबी 2055 मिमी देण्यात आली आहे.
  • या मॉडेलमध्ये ड्युअल-टोन फिनिश आहे. क्लासिक 350 आणि Meteor 350 वर वापरलेले इंजिन सारखेच असले, तरी ब्रँडने रायडर्सच्या नवीन विभागाला लक्ष्य करून डिझाईनच्या दृष्टीने काही बदल केले आहेत.
  • कलरबाबत बोलायचे झाल्यास ही बाईक ‘ड्युअल टोन’ व ‘सिंगल टोन’ कलर्समध्ये येईल..
  • बाईकवर लहान व उंच सायलेन्सर व मागील चाकाचा उंचावलेला मडगार्ड देखील ‘रोडस्टर’ लूक देतो.
  • हंटर क्लासिक व Meteor या दोन्हीपेक्षा लांबी व उंचीने लहान असणार आहे.
  • तसेच, 20.2 bhp आणि 27 Nm टॉर्कसह अपेक्षित 5-स्पीड गिअरबॉक्स देखील मिळेल.
  • वजनाने हलकी असल्यामुळे या बुलेटकडून अधिक चांगल्या मायलेजची अपेक्षा आहे.

किंमतीबाबत..

‘रॉयल एनफील्ड हंटर 350’ या बाईकची स्पर्धा ‘होंडा सीबी-350’, ‘टीव्हीएस रोनिन’, ‘जावा 42’ या बाईक्ससोबत असणार आहे.. या बुलेटची किंमत ‘क्लासिक 350’ आणि ‘Meteor 350’ पेक्षा कमी असू शकते.. ही बाईक 1.7 लाख एक्स शोरूम किंमतीत उपलब्ध होऊ शकते, असे सांगितले जाते..

Advertisement

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement