नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे.. ‘एलआयसी हाउसिंग फायनान्स लिमिटेड’मध्ये विविध पदांसाठी नोकर भरतीची प्रक्रिया सुरु झाली आहे.. या भरतीबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे.. या भरतीसाठी पात्र उमेदवारांना दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहेत.
‘एलआयसी हाउसिंग फायनान्स लिमिटेड’मध्ये (LIC HFL Recruitment 2022) होत असलेल्या या पदभरतीबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊ या..
एकूण जागा – 80
या पदांसाठी भरती
- सहाय्यक – 50
- सहाय्यक व्यवस्थापक – 30
शैक्षणिक पात्रता
- सहायक – कोणत्याही शाखेतील पदवीधर (किमान एकूण 55% गुण)
- सहाय्यक व्यवस्थापक – कोणत्याही शाखेतील पदवीधर (किमान एकूण 60% गुण) किंवा पदव्युत्तर
दरमहा पगार
- सहायक – 22,730/- रुपये
- सहाय्यक व्यवस्थापक – 53,620/- रुपये
अर्ज शुल्क – 800/- रुपये
वयोमर्यादा
- सहाय्यक – 21 ते 28 वर्षे
- सहायक व्यवस्थापक –
– DME – 21 ते 40 वर्षे
– इतर – 21 ते 28 वर्षे
निवड पद्धती – उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे करण्यात येईल.
अर्ज करण्याची अंतिम तारीख – 25 ऑगस्ट 2022
असा करा अर्ज..
- सर्वप्रथम www.lichousing.com या अधिकृत संकेतस्थळावर जा
- नंतर ‘करिअर’ टॅबवर क्लिक करा.
- आता अर्ज करण्याच्या ऑप्शनवर क्लिक करा.
- तुमचं रजिस्ट्रेशन व अर्जाची प्रोसेस पूर्ण करा.
- फॉर्म भरल्यानंतर शुल्क भरुन अर्जाची प्रिंट काढून ठेवा.