SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘जिओ’ची ‘5G’ सेवा स्वातंत्र्यदिनापासून..? किती पैसे मोजावे लागणार..?

मोबाईल युजर्ससाठी महत्वाची बातमी आहे.. केंद्र सरकारकडून नुकतीच 5G स्पेक्ट्रमसाठी लिलाव प्रक्रिया राबवण्यात आली. त्यात टेलिकाॅम क्षेत्रातील अनेक दिग्गज कंपन्यांनी भाग घेतला.. मात्र, त्यात खरी बाजी मारली, ती ‘रिलायन्स जिओ’ कंपनीनेच..!

‘एअरटेल’ (Airtel) कंपनीने या महिन्याअखेर ‘5G’ सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.. त्यामुळे इतर कंपन्या कधीपर्यंत ‘5G’ सेवा सुरु करणार, तसेच त्यामुळे रिचार्ज प्लॅनच्या किंमती वाढणार तर नाही ना, असे प्रश्न मोबाईल युजर्ससमोर निर्माण झाले आहेत.. या साऱ्या पार्श्वभूमीवर ‘रिलायन्स जिओ’कडून (Reliance Jio) मोठी बातमी समोर आली आहे..

Advertisement

देशात फायबरची उपलब्धता व मजबूत जागतिक भागीदारीसह कमीत कमी वेळेत ‘5G’ सेवा सुरू करण्यासाठी सज्ज असल्याचे ‘जिओ’कडून सांगण्यात आलं.. जागतिक दर्जाची, तसेच ग्राहकांना परवडेल अशी ‘5G’ सेवा देण्यासाठी ‘जिओ’ वचनबद्ध असल्याचंही कंपनीने म्हटलं आहे.

स्वातंत्र्यदिनापासून ‘5G’ सेवा

Advertisement

येत्या 15 ऑगस्टला, म्हणजेच स्वातंत्र्यदिनी भारतात ‘5G’ सेवा लाँच करण्याचा निर्णय ‘जिओ’ने घेतल्याचे समजते.. यंदा भारत आपला अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन साजरा करीत आहे.. स्वातंत्र्यदिनाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी ‘जिओ’ याच दिवशी ग्राहकांसाठी ‘5G’ सेवा सुरू करणार असल्याचे समजते..

‘रिलायन्स जिओ इन्फोकॉम’चे अध्यक्ष आकाश अंबानी यांनी तसे संकेत दिले आहेत. ते म्हणाले होते, कीृ संपूर्ण भारत 5G रोलआउटसह ‘आझादी का अमृत महोत्सव’ साजरा करील. त्यामुळे स्वातंत्र्यदिनापासून ‘जिओ’ची ‘5G’ सेवा सुरु होण्याची शक्यता आहे..

Advertisement

‘5G’ सेवा सुरू झाल्यानंतर ग्राहकांना कोणत्याही व्यत्ययाशिवाय सुपरफास्ट इंटरनेट स्पीड मिळणार आहे.. त्याचा शिक्षण, कृषी, आरोग्य यांसह विविध क्षेत्रांना मोठा फायदा होणार आहे. शिवाय, सध्या कॉल करताना ज्या समस्यांचा सामना करावा लागतो, तशा समस्या येणार नसल्याचेही सांगण्यात येते..

अर्थात, युजर्सला ‘5G’ सिमकार्ड व 5G स्मार्टफोनही घ्यावे लागणार आहेत. त्याशिवाय, या सेवेचा आनंद घेता येणार नाही. ‘4G’ स्मार्टफोनमध्ये ‘5G’ सेवा मिळणार नाही. तसेच, ‘5G’ सेवा सुरु झाल्यानंतर रिचार्ज प्लॅनमध्ये काय बदल होतील, याबाबतही अद्याप ठोस माहिती समोर आलेली नाही..

Advertisement

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement