SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

हर घर तिरंगा: आता ‘तिरंगा’ घरबसल्या मिळणार, ‘येथे’ करा ऑर्डर..

“आजादी का अमृत महोत्सव” या पार्श्वभूमीवर ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत (Har Ghar Tiranga) सर्व भारतीयांना आपापल्या घरावर किंवा घरामध्ये एक तिरंगा फडकत असावा, असं आवाहन करण्यात आलं आहे. येत्या 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त हा उपक्रम देशभर राबवला जाणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी नुकतीच ‘हर घर तिरंगा’ मोहीम सुरू करून ‘हर घर तिरंगा’ मोहीमेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे भारतीयांना आवाहन केले आहे. देशाप्रती प्रेमाची भावना व्यक्त करण्यासाठी, याचसोबत आपल्या राष्ट्रध्वजासोबत ऋणानुबंध अधिक घट्ट होण्यासाठी हर घर तिरंगा’ मोहीमेअंतर्गत येत्या 13 ते 15 ऑगस्ट या काळात तुमच्या घरांमध्ये तिरंगा लावा किंवा घरावर तिरंगा फडकवा, असं आवाहन काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान मोदींनी केलं आहे.

Advertisement

लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत भारताचा राष्ट्रध्वज कोणी ना कोणी विकत घेत असतात. त्यालाच आपण ‘तिरंगा’ असं म्हणतो. जर तुम्हाला घरबसल्या तिरंगा मागवायचा असेल तर पोस्टाने एक सेवा सुरू केली आहे. देशभरात ध्वजांचा पुरवठा करण्यासाठी भारत सरकारने लगेच पावले उचलत कामे सुरू केली. भारतातील सर्व पोस्ट ऑफिसमध्ये 1 ऑगस्ट 2022 पासून भारताच्या राष्ट्रध्वजाची विक्री सुरू करण्यात आली आहे.

तिरंगा तुम्हाला घरबसल्या ऑनलाईन ऑर्डर करून मागवायचा असेल तर त्यासाठी काही सोप्या स्टेप्स तुम्हाला फॉलो कराव्या लागतील..

Advertisement

▪️ पोस्ट ऑफिसच्या पुढील अधिकृत वेबसाईटला भेट द्या 👉 www.epostoffice.gov.in

▪️ आता तुम्हाला वेबसाईटच्या होम पेजवर तिरंगा दिसेल. त्यावर क्लिक करा. मग नंतर तुम्हाला डाव्या बाजूस एक तिरंगा आणि त्याची 25 रुपये किंमत दिसेल.

Advertisement

▪️आता तिरंगा ऑर्डर करण्यासाठी उजव्या बाजूस LOGIN (लॉग इन) पर्यायावर दाबा आणि साइन इन करा.

▪️ या ठिकाणी लॉग इन केलं की तुम्हाला तुमचं नाव, पत्ता मोबाईल नंबर आणि तुम्हाला किती संख्येने तिरंगा पाहिजेत ते नमूद करा.

Advertisement

▪️ मग तुम्ही दिलेली ऑर्डर कन्फर्म करण्यासाठी, पोस्टातून तिरंगा खरेदी करण्यासाठी तुम्हाला 25 रुपये पेमेंट करावे लागेल. लक्षात ठेवा की तुम्ही जर एकदा ऑर्डर केली तर तुम्हाला ती रद्द करता येणार नाही.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 http://play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement