भारतातील महागाईने उच्चांक गाठला असतानाच आता देशातील सर्वसामान्य जनतेला पुन्हा जोर का झटका बसणार आहे. कारण रिझर्व्ह बँकेकडून (RBI) पुन्हा एकदा रेपो दरात वाढ करण्याची घोषणा आरबीआयचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी केली आहे.
यंदाच्या वर्षभरात रिझर्व्ह बँकेने सलग तिसऱ्यांदा रेपो रेट वाढवला आहे. यामुळे कर्जे महागणार असल्याने सामान्यांचे महागाईने कंबरडे मोडणार आहे. यावेळी रेपो दर 50 बेस पॉईंट म्हणजे 0.50 टक्क्याने वाढवला आहे. यामुळे रेपो रेट 5.40 टक्के झाला आहे. म्हणजेच तुमच्या कर्जाच्या EMI मध्ये वाढ होणार आहे.
2022-23 मध्ये महागाई दर 6.7 टक्के राहण्याचा अंदाज आहे; तर 2023-24 च्या पहिल्या 3 महिन्यांत किरकोळ महागाई (सीपीआय) दर 5 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तर 2022-23 मध्ये GDP वृद्धीचा अंदाज 7.2 टक्के एवढा कायम ठेवण्यात आलाय. GDP वृद्धी पहिल्या तिमाहीमध्ये 16.2 टक्के, दुसऱ्या तिमाहीमध्ये 6.2 टक्के, तिसऱ्या तिमाहीमध्ये 4.1 टक्के आणि चौथ्या तिमाहीमध्ये 4 टक्के राहण्याचा अंदाज असल्याचे दास यांनी म्हटले आहे.
भारतात रेपो दरवाढीचा बोजा बँका त्यांच्या ग्राहकांवर टाकत असतात. जर तुम्ही एखाद्या बँकेचे कर्जदार असाल, तर तुम्ही कर्जाचे हप्ते भरत असताना ते आता तो कर्जाचा हप्ता वाढणार आहे. गृहकर्जासोबतच वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्जाचा हप्ताही वाढणार आहे. महागाई वाढलेली असून यावर नियंत्रण मिळवण्यासाठी रेपो दरात वाढ करून बँकेकडून अनेक प्रकारची कर्जे महाग होत असतात.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 http://play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy