SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

एका चार्जवर 500 किमी धावणार, ‘या’ ई-बाईकची जगभरात चर्चा..

जगात चर्चा असणारी ऑप्टी बाईक कंपनीची आर-22 एव्हरेस्ट (Optibike R22 Everest) ई-बाइक लॉंच झाली आहे. जी एक चार्जमध्ये जवळपास 500 किमीपर्यंत जाऊ शकते. हे अंतर पार करण्यासाठी बाईकवर किती वजन हवं, चार्जिंग किती हवी, किती ताशी किती किमी वेग हवा, अशी सर्व माहीती कंपनीने दिली आहे.

जाणून घ्या आकर्षक फीचर्स आणि महत्वाची माहीती:

Advertisement

▪️ Optibike च्या ताकदवान अशा या बाईकचे नाव R22 Everest असे आहे. नावातच पर्वत चढण्यासाठी सोयीस्कर वाटत आहे. म्हणजेच इथे अर्थ आपण मोठ्या घाटात वा ठराविक उंचीवर ती आपण नेऊ शकतो. बाईकला पायंडलही आहे.

▪️ बाईकच्या रेंजबद्दल कंपनीने दावा केलाय की, जर बाईकस्वाराचे वजन जास्तीत जास्त 73KG असेल तर ताशी 25KM ही बाईक 483KM जाऊ शकते. ही रेंज चालकाच्या वजनावर, बाईकच्या 42KG वजनावर अवलंबून असेल.

Advertisement

▪️ बाईकची स्टेबिलीटी कायम राहावी यासाठी R22 Everest ई-बाइक मध्ये डाऊनहील ड्युअल क्राऊन फॉर्क दिलाय. बाईकला 3260 डबल बॅटरी पॅक दिलाय. बॅटरी पॅक रिमूव्हेबल आहेत. बाईकला 1700 W इतक्या शक्तीची मोटर आहे. जी 2500W इतकी पीक पॉवर देते. यात Optibike PowerStorm MBB सिस्टम आहे. यामुळेच ही इलेक्ट्रिक बाइक 40% चढणही पार करू शकते.

▪️ बाईकच्या किंमतीबाबत सांगायचं झालं तर ही बाईक 18,900 अमेरिकी डॉलर म्हणजेच 14.96 लाख रुपयांना आहे. इतक्या किमतीला उपलब्ध आहे. सध्या महागडी असणारी ही ई-बाईक येत्या काही वर्षांत सगळीकडे ई-बाईक चे मार्केट होईल तेव्हा स्वस्त मिळेल आणि किंबहुना त्याच्या आतमध्येच इतर कंपनीची स्वस्त ई-बाईक आली की ती आपण घेऊ शकतो.

Advertisement

▪️ कंपनीच्या माहितीनुसार नुसार ही बाईक सध्या मर्यादीत दुकानांमधून खरेदी करता येऊ शकते. यासाठी तुम्ही बाईकच्या नावाने गूगल सर्च करून इतर अधिक माहीतीदेखील मिळवू शकतात.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 http://play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement