SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य: तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या..

मेष (Aries): नवीन काम सुरुवात करताना सावध रहा. जबाबदारीची जाणीव ठेवाल. कामाचा भर वाढू शकतो. अतिश्रमाने थकवा जाणवेल. जवळच्या प्रवासाचा आनंद घ्याल. आजचा दिवस सुखाचा आणि समृद्धीचा जाणार आहे. कामात यश मिळून तुमचे कौतुक केले जाईल. प्रिय व्यक्ती तुमच्यावर आज खुप खूश असेल. आई-वडिलांची साथ लाभेल. उत्पन्न वाढू शकते. तुमच्या कामाचे कौतुक होईल. कामात यश मिळेल.

वृषभ (Taurus): दिवस चांगला जाईल. रेस, जुगार यातून लाभ संभवतो. हातातील काम पूर्ण होईल. वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे. भावंडांचे सौख्य लाभेल. आजचा दिवस संमिश्र पद्धतीचा असणार आहे. एखादी नवीन संधी चालून येण्याची शक्यता आहे. त्याचा पूरेपूर उपयोग करून घ्या. पैशांच्या बाबत अडचण जाणवेल. खर्चावर नियंत्रण ठेवा. घरातील ताणतणावामुळे त्रस्त राहाल.

Advertisement

मिथुन (Gemini) : नवीन कामातून समाधान लाभेल. कामाच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल. जवळचे नातेवाईक भेटतील. तुमच्या शब्दांना चांगली धार येईल. विचारपूर्वक बोलावे लागेल. घरात भांडणे होण्याची शक्यता आहे. आपल्या रागावर नियंत्रण ठेवून समोरच्या व्यक्तीशी बोलावे. आई-वडिल यांच्या आज्ञांचे पालन करा. मित्रपरिवारासह बाहेर जाण्यासाठी वेळ काढा.

कर्क (Cancer) : संताप आवरावा लागेल. काही कामांवर तुमच्या मनस्थितीचा परिणाम होऊ शकतो. व्यवहारात न्याय आणण्याचा प्रयत्न करावा. धार्मिक यात्रेचा बेत आखाल. प्रयत्नात कसूर करू नका. आज पैशांची भरभराट होईल. तुम्ही सर्व प्रकारचे आनंद घेण्यासाठी उत्सुक असाल. तसेच नोकरीच्या ठिकाणी कामाचे कौतुक केले जाईल. प्रिय व्यक्ती मात्र तुमच्या वागण्यामुळे खुश नसेल. जवळच्या व्यक्तीशी भांडण करणे टाळा.

Advertisement

सिंह (Leo) : अनाठायी खर्चाला आवर घालावी. कौटुंबिक वादावर नियंत्रण ठेवावे. जोडीदाराचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. क्षुल्लक गोष्टीवरून चिडू नका. मनात नकारात्मक विचार आणू नका. प्रिय व्यक्तीकडून तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव केला जाईल. घरातील मंडळीना वेळ द्या. नोकरीच्या ठिकाणी सावधगिरी बाळगा. हलगर्जीपणा करु नका. नोकरीच्या ठिकाणी मान-सन्मान मिळेल. प्रवासातून लाभ होण्याची शक्यता आहे.

कन्या (Virgo) : भावंडांशी संबंध सुधारतील. घराविषयी काही महत्त्वाच्या चर्चा होतील. अचानक धनलाभ संभवतो. नवीन कामाला चांगली सुरुवात होईल. कामाची गतीमानता वाढेल. आजच्या दिवशी आत्मविश्वासाच्या जोरावर कामे पूर्ण करता येतील. घरातील मंडळींकडे लक्ष द्या. घाईगडबडीत कोणतेही निर्णय घेऊ नका. नोकरीच्या ठिकाणी कामे लक्षपूर्वक करा. शिक्षण क्षेत्राशी निगडित लोकांसाठी हा काळ वरदानापेक्षा कमी असणार नाही.

Advertisement

तुळ (Libra) : दिवस आपल्या आवडीप्रमाणे घालवाल. इतरांपेक्षा स्वत:च्या इच्छेला अधिक प्राधान्य द्याल. आवडत्या व्यक्तीची भेट होईल. झोपेची तक्रार जाणवेल. वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल. आज पैसे खर्च करण्यावर नियंत्रण ठेवा. मित्र परिवारासह बाहेर जाण्याचा बेत करा. प्रिय व्यक्तींशी प्रेमाने वागा. परिवारातील मंडळींची साथ लाभेल. प्रतिष्ठा वाढू शकते. वाहन खरेदी करू शकता.

वृश्‍चिक (Scorpio) : चांगला व्यावसायिक लाभ होईल. आपल्या मनातील इच्छा पूर्ण होईल. क्षुल्लक गोष्टींवरून चिडचिड वाढू शकते. स्व‍कीयांचे गैरसमज दूर करावेत. नाहक खर्च होऊ शकतो. आजचा दिवस उत्तम असेल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. घरातील मंडळींकडून कामाचे कौतुक केले जाईल. मित्रपरिवारासह बाहेर जाण्यास वेळ मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. कुटुंबियांसोबत वेळ घालवाल. व्यवहारातून लाभ होईल.

Advertisement

धनु (Sagittarius) : दिवस मजेत घालवाल. मित्रांसोबत प्रवास कराल. कौटुंबिक सौख्य वाढीस लागेल. घरात अधिक वेळ रमाल. भोजनात आवडीचे पदार्थ खाल. तुमच्या मित्रपरिवारामुळे तुमच्यावरील ताण कमी होईल. आई-वडिलांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करु नका. प्रिय व्यक्तीशी वाद घालणे टाळा. कामाच्या बाबत हलगर्जीपणा करु नका. उत्पन्न वाढल्याने पैशाशी संबंधित समस्या दूर होऊ शकतात.

मकर (Capricorn) : मनाची चलबिचलता जाणवेल. फार विचार करण्यात वेळ वाया जाईल. आपली तांत्रिक बाजू भक्कम करावी. हातापायाला किरकोळ इजा संभवते. उगाचच काळजी करत बसून राहू नका. आज नोकरीच्या ठिकाणी आपले काम उत्तम कसे आहे हे दाखविण्याची संधी मिळेल. आजचा तुमचा दिवस उत्साहात जाईल. मित्रपरिवारासह बाहेर जाता येईल. जोडीदारासोबत वेळ घालवाल, त्यामुळे वैवाहिक जीवन आनंदी राहील.

Advertisement

कुंभ (Aquarious) : शारीरिक स्वास्थ्याकडे लक्ष द्या. जोडीदाराशी मनमोकळा प्रेमालाप कराल. भागीदाराशी संबंध सुधारतील. संपर्कातील लोकात वाढ होईल. जवळच्या लोकांच्या भेटी घेता येतील. खूप दिवसांपासून अडकलेली कामे पूर्णत्वास घेऊन जाण्यास आज मदत मिळेल. कामात घाईगडबड न करता कामे पूर्ण कशी होतील याकडे जास्त लक्ष द्या. प्रिय व्यक्तीशी आदराने वागा. आई-वडिलांची साथ लाभेल. नोकरीच्या ठिकाणी सावधगिरीने वागा.

मीन (Pisces) : जोडीदाराची प्राप्ती वाढेल. मनात कसलाही गैरसमज आणू नका. कौटुंबिक वाद शांततेने हाताळा. कष्ट करूनच यश हातात पडेल. जमिनीच्या कामात अधिक लक्ष घालावे. आज घरातील मंडळींशी वाद होण्याची शक्यता आहे. प्रकृती बिघडेल पण योग्य वेळीच लक्ष द्या. आई-वडिलांशी प्रेमाने वागा. नोकरीच्या ठिकाणीसुद्धा कामे संयमाने पूर्ण करा. प्रिय व्यक्तीकडून तुम्हाला आनंदाची बातमी मिळेल.

Advertisement