SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

विमान प्रवास करण्याचं स्वप्न होणार पूर्ण, ‘येथे’ मिळणार फक्त 1,616 रुपयांत तिकीट..

देशातील खाजगी विमान कंपनीच्या Indigo फ्लाईट ऑपरेशनला 16 वर्षे पूर्ण झाली आहेत. आपण किंवा आपल्या जवळील व्यक्तीला अशातच इंडिगोने स्वस्तात विमान प्रवास करण्याची जबरदस्त ऑफर सादर केली. इंडिगोने देशांतर्गत सर्व मार्गांवर ‘स्वीट 16’ ऑफर आणली आहे. यामुळे विमानाने प्रवास करणाऱ्यांसाठी मोठा फायदा होणार आहे.

इंडिगोच्या फ्लाइट ऑपरेशनला 16 वर्षे पूर्ण झाल्यामुळे केवळ 1616 रुपयात फ्लाइट तिकीट दिले जात आहे. ही ऑफर 3 ऑगस्टपासून सुरू झाली असून तुम्हाला 03 ऑगस्ट 2022 ते 05 ऑगस्ट 2022 दरम्यान तिकिट बुकिंग करता येईल. 5 ऑगस्टपर्यंत ही ऑफर चालणार असून त्यानंतर ती संपणार आहे. या ऑफर अंतर्गत विमान प्रवास करायचा म्हटलं तर विमान तिकीट बुक करणारे प्रवासी 18 ऑगस्ट 2022 ते 16 जुलै 2023 पर्यंत प्रवास करू शकणार आहेत.

Advertisement

इंडिगोने आपल्या वेबसाईटद्वारे माहिती दिली आहे की, ही ऑफर इंटरग्लोब एव्हिएशन लिमिटेड (इंडिगो) द्वारे ऑफर केली जात आहे, ज्यामध्ये डोमेस्टीक मार्गांवर 1616 रूपयांपासून विमान प्रवास भाडे सुरू होते. जे की विविध डेस्टिनेशनवर वेगवेगळे असतील.

जर तुम्हालाही विमान प्रवास करण्याची इच्छा असेल तर 03 ऑगस्ट 2022 ते 05 ऑगस्ट 2022 दरम्यान हवाई तिकिटांचे बुकिंग करता येईल. आणि 18 ऑगस्ट 2022 ते 16 जुलै 2023 दरम्यान प्रवास करू शकतील. इंडिगोने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, इंडिगोच्या स्वीट 16 सेल ऑफरचे बुकिंग फ्लाइट सुटण्याच्या 15 दिवस आधी केले जाऊ शकते.

Advertisement

इंडिगोच्या ‘स्वीट 16’ ऑफरबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी क्लिक करा 👉 https://www.goindigo.in/sale.html

Sweet 16 ऑफर अंतर्गत जागांसाठी ही ऑफर आहे, हे अद्याप माहीती नाहीये. एअरलाइन्सने सांगितले की मर्यादित यादी आहे, यासाठी त्यांनी लवकरात लवकर तिकीट खरेदी करण्याचं आवाहन केलं आहे. मर्यादित जागा व उद्या 5 ऑगस्टपर्यंतच ऑफर असल्याने तुमच्याजवळ फक्त 1 दिवस बुकिंगसाठी उपलब्ध आहे. ऑफर करण्याबाबत अचानक घेतलेला निर्णय हा स्वतः इंडिगोवर अवलंबून असेल. इंडिगोने सांगितले की, ही ऑफर कोणत्याही ऑफर स्कीम, प्रमोशनसोबत जोडली जाऊ शकत नाही. ही ऑफर ट्रान्सफर, एक्सचेंज किंवा कॅश केली जाऊ शकत नाही. तुम्ही बुक केलेले तिकीट कॅन्सल करु शकणार नाहीत.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 http://play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement