‘आयफोन’ घेण्याचं अनेकांचं स्वप्न असतं.. मात्र, त्याची किंमत पाहूनच डोळे पांढरे पडतात.. त्यामुळे अनेक जण या फोनच्या वाटेलाही जात नाही.. मात्र, श्रीमंतीचा ‘आयकाॅन’ बनलेला हा ‘आयफोन’ आता तुमच्या आवाक्यात आलाय.. अगदी इतर कंपन्यांच्या स्मार्टफोनच्या किंमतीतच चक्क ‘आयफोन’ खरेदी करता येणार आहे..
भारतातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी ‘फ्लिपकार्ट’वर (Flipkart) सध्या दणदणीत ऑफर दिल्या जात आहेत. त्यातच तुम्हाला आयफोन-13 (iPhone 13) अगदी स्वस्तात खरेदी करण्याची संधी चालून आली आहे.. या फोनवर नेमक्या काय ऑफर्स दिल्या जात आहेत, हे जाणून घेऊ या..
‘आयफोन-13’ बाजारात घ्यायला गेल्यास, 128 जीबी स्टोअरेज व्हेरिएंटची किंमत आहे, 79,999 रुपये.. मात्र, ‘फ्लिपकार्ट’वर या फोनवर जबरदस्त सवलत दिली जात आहे.. त्यात 7 टक्के सूट दिलीय.. शिवाय, 5901 रुपयांचा ‘फ्लॅट डिस्काउंट’ मिळेल.. तसेच, एचडीएफसी (HDFC) बँकेच्या क्रेडिट कार्डद्वारे खरेदी केल्यास, तात्काळ 4000 रुपयांची सूट मिळेल..
फ्लिपकार्ट अॅक्सिसवर (Flipkart Axis) 5 टक्के कॅशबॅक ऑफरही सुरु आहे.. शिवाय, हा ‘आयफोन’ तुम्हाला ‘नो काॅस्ट ईएमआय’वरही खरेदी करता येईल. त्यासाठी तुम्हाला दर महिन्याला 12,334 रुपये द्यावे लागतील, तर ‘स्टँडर्ड ईएमआय’द्वारे 2566 रुपये मोजावे लागतील..
अशा सगळ्या ऑफर एकत्रित केल्यास, तुम्हाला तब्बल 19,000 रुपयांची सूट मिळू शकते. त्यानंतर हा फोन तुम्ही 54,999 रुपयांमध्येही खरेदी करु शकता.. शिवाय काही ठराविक मॉडेल्सवर आणखी 2000 रुपयांचा ‘डिस्काऊंट’ दिला जात आहे..
‘आयफोन-13’चे फिचर्स
- आयफोनमध्ये 6.1 इंच सुपर रेटीना एक्सडीआर डिस्प्ले असेल.
- तसेच, यात A15Bionic चिपसेट आहे.
- 128GB, 256GB व 512GB अशा स्टोरेजमध्ये फोन उपलब्ध आहे..
- फोनमध्ये ड्यूल रियर कॅमेरा असून, त्याचा पहिला व दुसरा सेंन्सर 12 मेगा पिक्सल्स, तसेच ‘फ्रंट सेंन्सर’ही 12 मेगा पिक्सलचा दिला आहे.