SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

पेट्रोल-डिझेल दरवाढीपासून होणार सुटका.. आता ‘या’ इंधनावर चालणार बाईक…!!

गेल्या काही दिवसांत पेट्रोल-डिझेलचे दर आवाक्याबाहेर गेले आहेत. त्यामुळे पेट्रोल-डिझेल ऐवजी नागरिकांचा कल ‘सीएनजी’, इलेक्ट्रिक वाहनांकडे वळला आहे.. जगभरातील देश पेट्रोल-डिझेलवरील अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी वेगळा पर्याय शोधला जात आहे..

भारतात गेल्या काही दिवसांत इलेक्ट्रिक गाड्यांच्या सेगमेंटमध्ये मोठी वाढ झालीय. या वाहनांना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसतं.. शिवाय, त्यामुळे प्रदूषण कमी होण्यासही मदत होते.. तसेच या वाहनांची ‘रनिंग कॉस्ट’ही खूप कमी आहे. त्यानंतर आता ग्राहकांसाठी आणखी एक मोठी बातमी येत आहे..

Advertisement

हायड्रोजनवर बाईक चालणार..

भारतीय बाजारात लवकरच ‘हायड्रोजन फ्यूल सेल’वर चालणारी दुचाकी लाँच होणार आहे. ‘टीव्हीएस’ कंपनी त्यासाठी प्रयत्न करीत आहे.. ही कंपनी लवकरच भारतात ‘हायड्रोजन फ्यूल सेल’वर आधारीत स्कूटर लाँच करणार असल्याचे समजते.. काही दिवसांपूर्वीच या कंपनीची इलेक्ट्रिक स्कूटर लाॅंच करण्यात आली होती..

Advertisement

‘टीव्हीएस’ कंपनीची ‘आयक्यूब’ (TVS iqube) ही इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आलेली आहे.. कंपनीकडून या स्कूटरमध्येच इलेक्ट्रिक बॅटरीऐवजी ‘हायड्रोजन फ्यूल सेल’चा (hydrogen fuel cell) वापर केला जाणार असल्याची चर्चा सुरु आहे.. ‘हायड्रोजन फ्यूल सेल’चा वापर करण्यासाठी ‘टीव्हीएस’ कंपनी तशी संधी शोधत असल्याचा दावा काही मीडिया रिपोर्ट्समध्ये केला आहे.

या अहवालानुसार, ‘टीव्हीएस’ कंपनीने स्कूटरसाठीच्या ‘हायड्रोजन फ्यूल सेल’च्या पेटंटसाठी अर्ज केलाय. त्यात ‘हायड्रोजन फ्यूल सेल’चं स्टोअरेज दोन सिलिंडरमध्ये केलं जाऊ शकतं. हे सिलेंडर चालकाच्या पायाखाली किंवा चेसीजवळ सेट केले जाऊ शकतात. तसेच, त्याचे ‘फिलर नोजल’ हेड लॅम्पजवळ असेल, असं सांगण्यात येतं..

Advertisement

‘हायड्रोजन फ्यूल सेल’ तंत्रज्ञानावर अनेक देश काम करीत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पेट्रोल-डिझेल ऐवजी ‘हायड्रोजन’ इंधन वापरण्याची योजना आखली जात आहे. कारमध्ये ‘हायड्रोजन’ सहज भरता (रिफिलिंग) येतो.. या वाहनांमधून धुराऐवजी पाणी बाहेर पडतं… त्यामुळे प्रदूषण होत नसल्याचा दावा करण्यात येतो..

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement