SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, ऊसाबाबत केंद्र सरकारचा महत्वपूर्ण निर्णय..

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काल (ता. 3 ऑगस्ट) झालेल्या अर्थविषयक मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी मोठ्या फायद्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. 2022- 2023 या साखर हंगामासाठी उसाला प्रति टन 150 रुपयांची वाढ करून 3050 रुपये एफआरपी (Sugarcane FRP) केंद्र सरकारने बुधवारी जाहीर केली.

उसाच्या भावात वाढ करण्याच्या निर्णयाचा देशातील 5 कोटी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फायदा (Sugarcane FRP) होणार आहे. साखर कारखाने आणि इतर पूरक उद्योगातून 5 लाख कामगारांना रोजगार मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून या निर्णयाचं स्वागत केलं जात आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी केंद्र सरकारने मागील 8 वर्षांमध्ये उसाच्या एफआरपीमध्ये 34 टक्क्यांची वाढ केली आहे.

Advertisement

बैठकीत झालेल्या निर्णयानुसार, 10.25% साखर उताऱ्यास प्रतिटन 3050 रुपये भाव मिळणार आहे. जर या भावापेक्षा कमी किंवा जास्त उतारा असला तर भाव कमी किंवा जास्त होईल. प्रत्येक 0.1% वाढीव उताऱ्यामागे प्रतिक्विंटल 305 रुपये वाढीव तर प्रत्येकी 0.1% कमी उतारा मागे प्रत्येक क्विंटल 305 रुपये कमी भाव मिळेल. याशिवाय उतारा 9.5 टक्क्यांच्याही खाली घसरल्यास भावात आणखी कपात केली जाणार नाही, अशीही माहीती आहे.

सन 2013-14 मध्ये 2100 रुपये प्रतिटन असलेला भाव गेल्या हंगामात 2900 रुपये झाला होता. आगामी 2022-23 वर्षामध्ये येत्या साखर हंगामात, उसाच्या लागवडीखालील क्षेत्र आणि अपेक्षित असलेले साखर उत्पादनात वाढ होणार असल्याचा अंदाज बांधून या हंगामामध्ये साखर कारखान्यांकडून 3 हजार 600 लाख टन साखरेची खरेदी होऊन, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 1 लाख 20 हजार कोटी रुपयांचा भरभक्कम मोबदला मिळू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 http://play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement