SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

छप्परतोड.. 1 लाखाचे झाले 68 लाख, फक्त 15 रुपयांच्या ‘या’ शेअरने गुंतवणुदार मालामाल..

शेअर बाजारातील गुंतवणूक म्हणजे, चढ-उतार होणारच.. इथं कधी नशीब पालटेल नि रंकाचा राजा होईल, हे सांगता येत नाही. तसेच कधी चांगले चांगले गुंतवणूकदारही इथे पुरते उद्ध्वस्त झाले आहेत.. तसेच, नशीबानं साथ दिल्याने काही जण रात्रीत मालामाल झाल्याचीही उदाहरणे आहेत..

सध्या अशाच एका शेअरची जोरदार चर्चा आहे.. या कंपनीचं नाव आहे, ‘एपीएल अपोलो ट्यूब्स लिमिटेड..’ लोखंड व स्टील उत्पादन घेणाऱ्या या कंपनीचा (Apl Apollo Tubes) शेअर गेल्या 10 वर्षांत 15 रुपयांवरून थेट 1000 रुपयांवर पोहोचलाय.. म्हणजेच तब्बल 6000 टक्क्यांहून अधिकचा परतावा या शेअरने गुंतवणूकदारांना दिलाय..

Advertisement

15 रुपयांच्या शेअरने मालामाल

‘एपीएल अपोलो ट्यूब्स’चा शेअर 3 ऑगस्ट 2012 रोजी ‘बॉम्बे स्टॉक एक्सचेंज’वर (BSE) फक्त 15.31 रुपयांच्या पातळीवर होता. हा शेअर आज (ता. 4 ऑगस्ट) ‘बीएसई’वर 1052.75 रुपयांवर ट्रेड करीत होता.. थोडक्यात, एखाद्याने 10 वर्षांपूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील, तर त्याला आज 67.82 लाख रुपये मिळतील..

Advertisement

फक्त 5 वर्षांचा विचार केला, तरी ‘एपीएल अपोलो ट्यूब्स’च्या शेअर्सनी गेल्या 5 वर्षांत 560 टक्के परतावा दिलाय. या कंपनीचा शेअर 4 ऑगस्ट 2017 रोजी ‘बीएसई’वर 157.69 रुपयांना होता. आता तो 1052.75 रुपयांवर गेलाय.. ‘एपीएल अपोलो ट्यूब्स’च्या शेअर्सनी गेल्या एका महिन्यात 23 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला..

‘एपीएल अपोलो ट्यूब्स’ कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांतील लो-लेव्हल 742.50 रुपये आहे, तर 52 आठवड्यांतील ‘हाय लेव्हल’ आहे, 1113.65 रुपये..! ‘एपीएल अपोलो ट्यूब्स’ कंपनीला जून-2022 तिमाहीत 59.39 कोटी रुपयांचा नफा झाला. एप्रिल-जून 2022 तिमाहीत कंपनीचा रेव्हेन्यू 2407.01 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले.

Advertisement

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement